महाराष्ट्र

maharashtra

सिद्धी नाईकची आत्महत्या प्रेमप्रकरणातून, पोलिसांनी केली बॉयफ्रेंडची चौकशी

By

Published : Aug 24, 2021, 7:04 AM IST

Updated : Aug 26, 2021, 12:38 PM IST

राज्याला हादरून सोडणाऱ्या बाणावली येथील दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहेत. प्रथमतः आत्महत्या समजल्या जाणाऱ्या या प्रकरणात तिच्या अंगावरील कपडे गायब झाल्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

siddhi naik
सिद्धी नाईक

पणजी (गोवा) - राज्यात मागच्या पंधरा दिवसापासून गाजत असलेल्या सिद्धी नाईकची आत्महत्या ही प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सिद्धीच्या प्रियकराचे तिच्याच बहिणीशी सूत जुळल्याने ती वैफल्यग्रस्त झाली होती. पोलिसांनी तिच्या प्रियकराची चौकशी केली असता ही गोष्ट निदर्शनास आली आहे.

राज्याला हादरून सोडणाऱ्या बाणावली येथील दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहेत. प्रथमतः आत्महत्या समजल्या जाणाऱ्या या प्रकरणात तिच्या अंगावरील कपडे गायब झाल्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

प्रेमाचा त्रिकोण, बहिणीचा वाढदिवस आणि सिद्धीची आत्महत्या -

सिद्धीला नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. म्हणून तिच्या प्रियकराने तिला सोडचिठ्ठी देऊन आपला मोर्चा तिच्या बहिणीकडे वळवला होता. सिद्धीच्या बहिणीचा तिच्या मृत्यूच्या अगोदर एक दोन दिवस वाढदिवस होता. तेव्हा तिच्या प्रियकराने तिचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले होते. त्यातूनच वैफल्यग्रस्त होऊन सिद्धीने आत्महत्या आहे, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.

हेही वाचा -सध्या देशातील काही शक्ती मागील ५-६ वर्षांपासून तरुणांची दिशाभूल करत आहेत -अशोक चव्हाण

वडिलांच्या जबाबात मतभिन्नता -

सिद्धी मागच्या काही दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे राहत होती, त्यातच तिचे अनेक वेळा तिच्या वडिलांशी भांडणही झाले. मृत्यूपूर्वी सिद्धी एक दिवस बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी म्हापसा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. बेपत्ता होण्यापूर्वीच सिद्धीने याच वैफल्यग्रस्तेतुन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अचानक दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मिळल्यावर तिच्या वडिलांना धक्का बसला. मात्र परिस्थितीची पूर्वकल्पना असल्यामुळे आणि शवविच्छेदन अहवालात तिचा बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी कोणताच आक्षेप न घेता सर्व सविस्तर माहिती पोलिसांना दिली होती. मृत्यूसमयी तिच्या अंगावर कपडे न मिळाल्यामुळे यात हत्या किंवा बलात्कार सारखी घटना घडला असावा, असा कयास व्यक्त करत त्यांनी आपल्या जबानीत घुमजाव करत त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

...आणि प्रकरणाला वेगळे वळण, काही प्रश्न अजूनही अनुत्तरित?

सिद्धीच्या मृत्यूसमयी तिच्या अंगावर कपडे नसल्यामुळे बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे विरोधी पक्षासह विविध सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत आंदोलने, कँडल मार्च काढून राज्यात हे प्रकरण चांगलेच तापविले होते. त्यातच जनतेचा मिळणार प्रचंड प्रतिसाद पाहून सिद्धीचे पालक, नातेवाईक वेळोवेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असत. त्यामुळे त्यांच्या जबाबात साधर्म्य नसल्याचे पाहून पोलिसांनी तपासाची सूत्रे तिच्याच घरात वळवत चौकशी केली असता आपल्या बहिणीच्या व प्रियकराच्या जुळलेल्या प्रेमसंबंधातून वैफल्यग्रस्त होऊन तिने आत्महत्या केल्याचे चौकशीअंती समोर आले आहे.

Last Updated : Aug 26, 2021, 12:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details