महाराष्ट्र

maharashtra

गोवा मुक्ती दिन : राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल

By

Published : Dec 19, 2020, 3:48 PM IST

राष्ट्रपती संध्याकाळी 5 वाजता पणजीतील आझाद मैदानावरील शहिद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर दयानंद बांदोडकर मैदानावरील कार्यक्रमात गोमंतकीयांना संबोधित करतील.

president ramnath kovind reached in goa
राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल

पणजी - गोवा मुक्ती दिनाच्या हिरकमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी रामनाथ कोविंद गोव्यात दाखल झाले आहेत. दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्वागत केले.

राष्ट्रपतींचे गोव्यात दाखल झाल्यानंतरचे छायाचित्र.

राष्ट्रपतींचा कार्यक्रम -

राष्ट्रपती संध्याकाळी 5 वाजता पणजीतील आझाद मैदानावरील शहिद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर दयानंद बांदोडकर मैदानावरील कार्यक्रमात गोमंतकीयांना संबोधित करतील. यावेळी गोव्याची कला आणि संस्कृती यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सादरीकरण करण्यात येईल. यासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, राजधानी पणजीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे.

हेही वाचा -गोवारी समाजाला धक्का! समाज आदिवासी नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

गोवा मुक्ती कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे

राष्ट्रपतींचे आगमन आणि हिरक महोत्सवी कार्यक्रयासाठी सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. तो थांबवावा अशी मागणी करणारी पत्रे तथा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी होणारा अपप्रचारात थांबवावा, यामध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा याकरिता काही संस्था, संघटनांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिली आहेत. त्यावर निशाणा साधताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राष्ट्रवादी नागरिक राष्ट्रपतींचे स्वागत करतील. कारण, गोवा मुक्ती कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती पहिल्यांदाच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु, कोविड महामारीचा विचार करता मर्यादित लोकांना प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी प्रवेश दिला जाणार आहे. तर गोमंतकीय जनतेला याचा आस्वाद घेता यावा यासाठी व्हर्च्युअल प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

मुक्तीदिन महोत्सवाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून गोमंतकाचा इ​तिहास आणि संस्कृती जगभर पोहोचविण्याचे नियोजन सरकारने केले आहे. त्यासाठी दहा मिनिटांची डॉक्युमेंटरी सादर करण्यात येणार असून, सुमारे १५० स्थानिक कलाकारांचा ‘गोंयचो गाज’ हा कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. खुद्द राष्ट्रपती कोविंद या कार्यक्रमाचा ४५ मिनिटे आस्वाद घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी (रविवारी) राष्ट्रपती आपल्या कुटुंबियांसमवेत खासगी भेटी देतील आणि संध्याकाळी दिल्लीकरीता रवाना होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details