महाराष्ट्र

maharashtra

नाशिक : पितृपक्षात का करावे पिंडदान; सांगत आहेत अनिकेत शास्त्री

By

Published : Sep 28, 2021, 7:33 AM IST

Updated : Sep 28, 2021, 8:14 AM IST

आपल्या पूर्वजांच्या नावे श्रद्धा म्हणून पित्र जेवायला घातले जातात. त्यामुले पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागचा समज आहे. या कालावधीत केले जाणारे पिंडदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते, अशी मान्यता आहे.

nashik
nashik

नाशिक - भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपल्या पूर्वजांच्या नावे श्रद्धा म्हणून पित्र जेवायला घातले जातात. त्यामुले पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, हा यामागचा समज आहे. या कालावधीत केले जाणारे पिंडदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते, अशी मान्यता आहे. मात्र, या काळात जर पिंडदान केले नाही, तर कुटुंबाला पितृदोष होऊन जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात, असे अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी म्हटले आहे.

'पिंडदान केले नाही तर, या अडचणी येऊ शकतात' -

पितृपक्ष काळात आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान, दानकर्म केले जातात. हे केल्यावर आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे. मात्र, या काळात जर कोणी नित्यकर्म पिंडकर्म दानकर्म तर्पण केले नाही, तर त्याला पितरांचे बाधा म्हणजे पितृदोष होऊ शकतो. अडचणी निर्माण होऊ शकतात. जर आपण पितृकृपा प्राप्त केली नाही, पितृनां निराश केले, तर विवाहकार्य, संतान सुख, नोकरी, वंशवृद्धी या गोष्टींना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या वाड वडिलांची आठवण करू यथा कर्म करावे, असे महंत मंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया

पितरांसाठी या गोष्टी करा -

सर्वप्रथम आपल्या पूर्वजांच्या इच्छानुसार दान पुण्य करा. या काळात गाईला दान केलं पाहिजे, या नंतर तूप,चांदी,पैसा, फळ,मीठ,तीळ,कपडे आणि गुळाचे दान करावे, या दानाचा संकल्प केल्या नंतर आपल्या ब्राम्हणा द्यावे,श्राध्द काळात हे दान तिथी नुसार करावे, असे केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

पितृपक्ष म्हणजे काय?

पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात. आत्म्याची तृप्ती होते. त्यांना शांती मिळते, असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर पाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्याला सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. मृत्यूनंतर जय पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म होत नाही, त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही, असा समज आहे.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात 'गुलाब'चा प्रभाव.. अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

Last Updated : Sep 28, 2021, 8:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details