महाराष्ट्र

maharashtra

Minor Girl Raped In Nagpur : लग्नाच्या दोन दिवस आधी नवरदेवाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार..

By

Published : May 11, 2022, 12:05 PM IST

Rape
बलात्कार

लग्नाला अवघे दोन दिवस राहिले असताना नवरदेवाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( bridegroom raped the minor girl ) केला. ही घटना नागपूर शहरातील गिट्टीखदान ( Gittikhadan Police Station Nagpur ) परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली ( Accused Arrested In Rape Case ) आहे.

नागपूर : नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी ( Gittikhadan Police Station Nagpur ) वायुदलातील एका कर्मचाऱ्याला पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आदित्यधनराज नरेश शाहू (28) असे या आरोपीचे नाव असून, अवघ्या दोन दिवसांनी त्याच्या लग्नाचा मुहूर्त ( bridegroom raped the minor girl ) होता. मात्र त्याआधीच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ( Accused Arrested In Rape Case ) आहेत.

बलात्कार करत दिली धमकी :आरोपी आदित्यधनराज शाहू हा वायुसेनेत कॉर्पोरल या पदावर कार्यरत असून, तो दुसऱ्या राज्यात तैनात आहे. 12 मे रोजी त्याचे लग्न नियोजित असल्याने तो लग्नासाठी रजेवर घरी आलेला होता. आदित्यधनराजच्या घरी लग्नाची लगबग सुरू असताना त्याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून बळजबरीने बलात्कार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवानिशी ठार मारण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. मात्र आई वडील घरी परत आल्यानंतर तिने सर्व आपबीती त्यांना सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी थेट गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


वधू पक्ष नागपुरात दाखल :आरोपी आदित्यधनराज शाहू याची पत्नी दुसऱ्या राज्यात राहणारी होती. मात्र लग्न सोहळा हा नागपूर होणार असल्याने वधू आणि त्यांचे कुटुंबीय नागपूरला येण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, नागपूरला येताच त्यांना आदित्यधनराजने केलेल्या कृत्याची माहिती समजली. त्यामुळे त्यांना मानसिक धक्काचं बसला आहे.

हेही वाचा : Love Jihad case: नाव बदलून केलं हिंदू मुलीशी लग्न, नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकत दिरांसह मौलानाने केला बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details