महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना दोन लाथा घाला, पहा काय म्हणाले सुनील केदार

By

Published : Sep 21, 2021, 11:32 AM IST

Updated : Sep 21, 2021, 11:57 AM IST

कितीही मोठा नेता असेल आणि पक्षाशी बेईमानी करत असेल, तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा लावा, तुमच्यावर पोलीस केस झाली तर मी पाहून घेईन असे वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. त्यांनी या वक्तव्यातून नाव न घेता पक्षातीलच माजी आमदार आशिष देशमुख यांना उद्देशून हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

नागपूर - कॉंग्रेसचा कितीही मोठा नेता असेल आणि पक्षाशी बेईमानी करत असेल, तर त्याला गाडीतून उतरवा आणि दोन लाथा लावा, तुमच्यावर पोलीस केस झाली तर मी पाहून घेईन असे वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. त्यांनी या वक्तव्यातून नाव न घेता पक्षातीलच माजी आमदार आशिष देशमुख यांना उद्देशून हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

बोलताना सुनील केदार

पक्षासोबत बेईमानी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा

नागपुर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षीय बैठकीचे रविवारी(19 सप्टेंबरला आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी पक्षासोबत बेईमानी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा असा आदेशच देऊन टाकले आहेत.

मला फोन करा मंत्रिपद बाजूला ठेवून मी येईल

निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मैदानात असताना जर कोणी नेता स्वतः काँग्रेस पक्षाची पद भोगत आव आणत असेल आणि कोणीतरी मोठा नेता माझ्या पाठीशी आहे असे समजून मी निवडणुकीत वाट्टेल ते करेन असे वागत असेल, तर त्याला दोन लाथा घाला. तसेच, मला फोन करा मी पण मंत्रिपद बाजूला ठेवून तिथे येईन, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी म्हणता माजी आमदार आशिष देशमुख यांच्या विरोधात हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

केदार यांच्यावर आशिष देशमुखानी केले गंभीर आरोप

माजी आमदार आशिष देशमुख यांचा मंत्री सुनील केदार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा केल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गुन्हेगार प्रवृत्ती असल्यामुळे मंत्रिपदावरून त्यांना हटवा अशी मागणी केली. त्यानंतर मंत्री केदार हे अवैधरिती उत्खनन करणाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर केला आहे. विरोधात करवाई करत पक्षश्रेष्टींना तक्रार केली होती. त्यामुळे मंत्री सुनील केदार हे अगोदरच संतापले असतांना जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत त्यांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी दोन लाथा हाना असे म्हणत त्यानी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा माजी आमदार आशिष देशमुख यांच्यादिशेने होता अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठरावाला मंजुरी देण्यात आली

या बैठकीला उपस्थित युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सीरिया यांनीही पक्षातील मंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य करून, पक्षाला कमजोर करण्याचे काम करत असल्याने त्यांना पक्षातून काढून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी या ठरावाला मजुरी देण्यात आली असल्याचेजी सूत्रांकडून सांगितले जात आहे. हा ठराव प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडे पाठवण्याची जवाबदारी कॉंग्रेचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र मुळक यांच्याकडे आहे. या संदर्भात दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मात्र मिळाला नाही. दरम्यान, या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, नाना गावंडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सीरिया, जिल्हा परिषदेच्या कुंदा राऊत, माटे यांच्यासह अनके पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated :Sep 21, 2021, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details