महाराष्ट्र

maharashtra

नागपूर विभागात ३३५ दिवसांत २१६ शेतकऱ्यांनी आर्थिक संकटामुळे संपवले जीवन!

By

Published : Jan 6, 2020, 5:29 PM IST

अवकाळी पाऊस आणि शेतीच्या संकटामुळे मागील ११ महिन्यात नागपूर विभागात २१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे.

farmers committed suicide
शेतकरी आत्महत्या

नागपूर -अवकाळी पाऊस आणि शेतीच्या संकटामुळे मागील ११ महिन्यात नागपूर विभागात २१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेती अधिक महाग झाली आहे. पेरणीपासून पीक कापेपर्यंत एकरी १० ते २० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना येतो, पण मोबदला मिळत नाही. याचे महत्वाचे कारण पिकांना योग्य हमीभाव नाही, असे शेतकरी नेते सांगत आहेत.

नागपूर विभागात ३३५ दिवसांत २१६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली...

हेही वाचा... #HBDKapilDev : क्रिकेटच्या कारकिर्दीत कधीही 'रनआऊट' न झालेला क्रिकेटपटू

त्यामुळे उत्पादनातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा उत्पादनासाठीचा खर्च अधिक आहे. शैक्षणिक खर्च वैद्यकीय खर्च, यासाठीही शेतकरी कर्ज घेतात. त्यातही सततचे अस्मानी संकट, यातूनच ३३५ दिवसांत २१६ शेतकऱ्यांनी आर्थिक संकटामुळे जीवन संपवले आहे.

हेही वाचा... जेएनयू हिंसाचार : स्वरा भास्कर, तापसी पन्नुसह बॉलिवूडकरांचा संताप

मागील ११ महिन्यात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही ५३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. तर, नागपूर जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. यात २१६ पैकी १४२ शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली नाही. जे शेतकरी जगू शकत नाहीत, ते आपले जीवन संपवण्याचा मार्ग निवडत आहेत. जे जीवन जगत आहेत आणि आत्महत्या करत नाहीत. त्यांची देखील परिस्थिती बिकट आहे, असे मत शेतकरी नेते विजय जावंदीया यांनी व्यक्त केले.

Intro:नागपूर


३३५ दिवसांत २१६ शेतकऱ्यांनी आर्थिक संकटामुळे संपवल जीवन




अवकाळी पाऊस आणि शेतीच्या संकटामुळे मागील ११ महिन्यात नागपूर विभागात २१६ शेतकऱ्यांनि आत्महत्या केली आहे.शेती अधिक महागाची झाली आहे पेरणी पासून पीक कापे पर्यन्त एकेरी १० ते २० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना येतो पण मोबदला मिळत नाही कारण पिकांना योग्य हमीभाव नाही. उत्पादनातून मिळणाऱ्या रकमे पेक्ष्या उत्पादना साठी खर्च अधिक आहे.शैक्षणिक खर्च वैद्यकीय खर्च या मुळे शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातही अस्मानी संकट. ३३५ दिवसांत २१६ शेतकऱ्यांनी या आर्थिक संकटामुळे जीवन संपवली आहे.Body:११ महिन्यात
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ८६ शेतकरी आत्महत्या आहे.चंद्रपूर जिल्ह्यातंही ५३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केली तर नागपूर जिल्ह्यात ४८ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.
२१६ पैकी अर्ध्यापेक्षा जास्त १४२ शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली नाही. मरु शकत नाहीत म्हणून ते जीवन जगत आहेत जे आत्महत्या करीत नाहीत त्यांची देखील परिस्थिती बिकट आहे असं मत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केलंय


बाईट- विजय जावंदीयाConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details