महाराष्ट्र

maharashtra

Public Holiday Mumbai : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, उद्या मुंबईत सार्वजनिक सुट्टी

By

Published : Feb 6, 2022, 9:09 PM IST

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने ( Lata Mangeshkar Passed Away ) राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच उद्या (दि. ७) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली ( Public Holiday Mumbai ) आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता ( Emergency Services Remain Opened ) इतर विभागांना सुट्टी असणार आहे.

उद्या मुंबईत सार्वजनिक सुट्टी
उद्या मुंबईत सार्वजनिक सुट्टी

मुंबई - भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ( Lata Mangeshkar Passed Away ) दुखवटा म्हणून राज्य सरकारने उद्या, सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली ( Public Holiday Mumbai ) आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानेही मुंबईत उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. उद्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना सुट्टी असणार ( Emergency Services Remain Opened ) आहे.

उद्या मुंबईत सार्वजनिक सुट्टी

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (सन १९८१चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उद्या सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू

राज्य शासनाच्या या आदेशानुसार बृहन्मुंबईतही उद्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालये, महानगरपालिका कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी बंद राहतील.

ABOUT THE AUTHOR

...view details