महाराष्ट्र

maharashtra

न्यायालयाने ज्ञानदेव वानखडे यांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

By

Published : Nov 12, 2021, 7:51 PM IST

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मागील सुनवाणीच्या वेळी दिल्या होत्या.

Bombay high court
Bombay high court

मुंबई -समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज (शुक्रवारी) दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मागील सुनवाणीच्या वेळी दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

ज्ञानदेव वानखडे यांच्या याचिकेत काय
ज्ञानदेव यांनी नवाब मलिक यांच्याकडून 1.25 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मलिक यांनी त्यांचा मुलगा समीर वानखेडे आणि कुटुंबाविरोधात पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मलिक यांचे वक्तव्य बदनामीकारक असल्याचे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यावर सोशल मीडिया अकाऊंटसह मीडियामध्ये काहीही वक्तव्य जारी करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे मलिक यांना आतापर्यंतची सर्व बदनामीकारक विधाने मागे घेण्याचे आणि फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध पोस्ट केलेले सर्व ट्विट हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -कंगना रणौतचा पद्मश्री तात्काळ परत घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करा, नवाब मलिकांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details