महाराष्ट्र

maharashtra

आर्यन खान प्रकरणात शिवसेना नेते किशोर तिवारी यांची उडी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

By

Published : Oct 19, 2021, 11:28 AM IST

Updated : Oct 19, 2021, 2:54 PM IST

ड्रग्स प्रकरणात शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आर्यन खान प्रकरणात सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली आहे. एक पत्र लिहून किशोर तिवारी यांनी एनसीबीच्या विरोधात तक्रार करत मानवाधिकार जपण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर थांबावावा यासाठी सुओ मोटू ह्या प्रकारणाची दखल घेण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
शिवसेना नेते किशोर तिवारी
शिवसेना नेते किशोर तिवारी

मुंबई - मुंबईतील क्रुज ड्रग्स प्रकरणात शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आर्यन खान प्रकरणात सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली आहे. एक पत्र लिहून किशोर तिवारी यांनी एनसीबीच्या विरोधात तक्रार करत मानवाधिकार जपण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर थांबावावा यासाठी सुओ मोटू ह्या प्रकारणाची दखल घेण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

किशोर तिवारी - याचिकाकर्ते आणि शिवसेना नेते

तिवारी यांच्या याचिकेत काय

किशोर तिवारी यांनी आपल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कोर्टाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. 17 दिवस आर्यन खान हा जेलमध्ये असून त्यात दिरंगाई होत असल्याचा आक्षेप घेत गेल्या काही काळापासून एनसीबी ही फिल्म इंडस्ट्री व मॉडेल्सला हेतुपुरस्सर टार्गेट करत असल्याचही त्यांनी म्हटले आहे.

कधी झाली अटक?

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर, उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. येथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आर्यन खानचा जामीन वर उद्या फैसला

उद्या 20 ऑक्टोबरला होणाऱ्या सुणावणीत आर्यन खानला जामीन मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्यन खानतर्फे अमित देसाई, सतीश मानशिंदे यांनी आर्यन खानची बाजू न्यायालयापुढे मांडली आहे. तर, एनसीबीकडून अनिल सिंह यांनी बाजू मांडली आहे. आर्यनचा ट्रायल नंबर N956 आहे. तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या नंबरच्या नावाने ओळखले जाते. त्याचमुळे आर्यनला त्याचा कैदी नंबर मिळाला आहे. आर्यन खान तुरुंगात वैतागलेला दिसून येतो. त्याला तुरुंगात मिळणारे जेवण आवडत नसल्याने तो जेवतदेखील नाही. तुरुंगात बाहेरचे जेवण आणण्याची परवानगी नाही. आर्यन खान जेवण करत नसल्यामुळे जेल प्रशासनाकडे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. आर्यन तुरुंगात त्याचे घरचे कपडे घालत आहे.

आर्यनला शाहरुख खानकडून मनी ऑर्डर

जेलमध्ये ११ ऑक्टोबरला आर्यन खानला साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर आली आहे. आर्यनला हे पैसे त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने पाठवले आहेत. मनी ऑर्डरने आलेल्या या पैशांचा वापर आर्यन कॅन्टीनमधील जेवणासाठी करु शकतो. तसेच, तुरुंगातील नियमांनुसार कैदींना पैसे हे फक्त मनी ऑर्डरने पाठवले जाऊ शकतात आणि त्यासाठी ४ हजार ५०० रुपये ही जास्तीत जास्त रक्कम आहे. तसेच, ही रक्कम महिन्यातून एकदाच पाठवता येते. त्यामुळे कोणत्याही कैदीचे घरचे याहून जास्त पैसे मनी ऑर्डरद्वारे पाठवू शकत नाहीत.

हेही वाचा -कोजागिरीच्या पुर्वसंध्येला दुधाच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ

Last Updated :Oct 19, 2021, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details