महाराष्ट्र

maharashtra

No Summer Holidays for School : उन्हाळी सुट्टी का रद्द ? अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता राज्यातील शाळा एप्रिलमध्येही सुरु राहणार!

By

Published : Mar 28, 2022, 9:35 PM IST

Updated : Mar 28, 2022, 10:26 PM IST

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शाळा बंद ठेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू ( online education in corona crisis ) होते. आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना, कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात ( restrictions in pandemic ) येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी ( reopen Schools in March 2022 ) दिली जाते.

शाळा एप्रिलमध्ये सुरू
शाळा एप्रिलमध्ये सुरू

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. फक्त शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. आता कोरोना नियंत्रणात आल्याने शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदा राज्यातल्या शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिलमध्येही पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

शनिवारी पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक-
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शाळा बंद ठेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू ( online education in corona crisis ) होते. आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना, कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात ( restrictions in pandemic ) येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी ( reopen Schools in March 2022 ) दिली जाते. या शैक्षणिक वर्षात एप्रिल महिन्यांत इयत्ता पहिली ते नववी व अकरावीची शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक स्वरुपात मुलांना शाळेत हजर राहावे लागणार आहे.

हेही वाचा-Alcohol Abhisheka For God : चक्क देवाला चढवला जातो दारु अन् सिगारेटचा नैवैद्य; पाहा, व्हिडिओ...

काय आहे आदेश -
एप्रिल महिन्या अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येईल. इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा. सकाळच्या सत्रात शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्णवेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात. दररोज १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे.

हेही वाचा-Vikrampur village of Gopalganj: बिहारच्या 'या' गावात माश्यांमुळे मोडली लग्नं, जाणून घ्या काय आहे प्रकरण

पालकांमध्ये नाराजीचा सूर -
दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये पालक आपल्या मुलांना घेऊन सहलीसाठी किंवा नातेवाइकांकडे जातात. अनेकांनी रेल्वेची बुकींगही केली आहे. मात्र सुट्टी लांबल्याने पालकांना हे नियोजन करता येणार नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

हेही वाचा-Pramod Sawant Goa CM Charge : जाहीरनाम्याची वचनपूर्ती करणार; शपथविधीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत लागले कामाला

Last Updated : Mar 28, 2022, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details