महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut Criticized : 'ते कधीपासून हिंदू झाले हे तपासावे लागेल; संजय राऊतांचा भाजप-मनसेवर निशाणा

By

Published : Mar 21, 2022, 6:04 PM IST

Updated : Mar 21, 2022, 9:17 PM IST

राज्यभर आज तिथीनुसार शिवजयंती (Shivjayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, यानिमित्ताने आता पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत (Hindutva) आला आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यानिमित्ताने भाजप (BJP) व मनसेवर (MNS) निशाणा साधला आहे.

sanjay raut
संजय राऊत

मुंबई - राज्यभर आज तिथीनुसार शिवजयंती (Shivjayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, यानिमित्ताने आता पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत (Hindutva) आला आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यानिमित्ताने भाजप (BJP) व मनसेवर (MNS) निशाणा साधला आहे. ते कधीपासून हिंदू झालेत हे तपासावे लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत

हा इतिहास लक्षात ठेवा -

राऊत म्हणाले की, महाराजांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. शिवचरित्रातून आज ही प्रेरणा मिळते. त्यामुळे दिल्लीचा तख्त वापरून महाराष्ट्र झुकवता येईल असा कोणी विचार देखील मनात आणू नये. महाराजांना झुकवण्यासाठी इथे आक्रमणे झाली. पण, आक्रमण करणाऱ्यांची बोटे छाटली गेली. औरंगजेब देखील असाच आला होता. पण, त्याची कबर याच महाराष्ट्राने खोदली. त्यामुळे महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनी हा इतिहास लक्षात ठेवावा.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा स्वभाव एकच -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीसाठी दिल्लीत बोलावल्याचे ऐकले. महाराष्ट्रात देखील हेच सुरू आहे. पण, या तपास यंत्रणांनी लक्षात ठेवावे ही दोन क्रांतिकार्य राज्य आहेत, ती दिल्लीपुढे कधीही झुकणार नाहीत, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ते कधीपासून हिंदू झाले? -

भाजपचे हिंदुत्व हे कातडीसारखे मजबूत, तर शिवसेनेचे हिंदुत्व हे शालीसारखे झूल पांघरलेले असल्याची टीका भाजपने केली होती. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, अरे बापरे.. हो का? ते कधीपासून हिंदू झाले हे तपासून पाहावे लागेल.

ज्याची त्याची बुद्धी; मनसेला टोला -

आजच्या मनसेच्या तिथीनुसार शिवजयंतीवर बोलताना राऊत म्हणाले की, हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जन्म घेतला, ते आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले हेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपल्या राज्याला इतिहास आहे.

Last Updated : Mar 21, 2022, 9:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details