महाराष्ट्र

maharashtra

RS Election 2022 : 'सामना बरोबरीत'.. महाविकास आघाडी- भाजपने जिंकल्या राज्यसभेच्या प्रत्येकी तीन जागा, संजय पवारांना पराभवाचा धक्का

By

Published : Jun 11, 2022, 6:20 AM IST

Updated : Jun 11, 2022, 8:43 AM IST

रात्री उशिराने सुरु झालेल्या राज्यसभेच्या मतमोजणीनंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आखाड्यातला सामना बरोबरीत सुटला आहे. सहापैकी तीन जागा महाविकास आघाडी तर तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. यात सर्वाधिक उत्सुकता लागलेल्या धनंजय महाडिक विरुद्ध संजय पवार यांच्यातील लढतीत धनंजय महाडिकांचा विजय झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार पराभूत झाल्याने हा एकप्रकारे महाविकास आघाडीला धक्काच आहे.

RS Election 2022
राज्यसभा निवडणूक २०२२

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल (Maharashtra Rajya Sabha Election 2022) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.

विजयी उमेदवारांची नावे -

1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43

2. इम्रान प्रतापगढी - काँग्रेस - 44

3. पियुष गोयल - भाजप - 48

4. अनिल बोंडे- भाजप- 48

5. संजय राऊत- शिवसेना - 42

6. धनंजय महाडिक - भाजप

राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत झाली. त्यात महाविकास आघाडीची पाच मते फुटल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.

सत्ताधारी आघाडीला मोठा धक्का -शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीला मोठा धक्का बसला. भाजपने शनिवारी राज्यसभेच्या सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर सत्ताधारी युतीने मतमोजणीला आठ तास उशीर झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी यांनीही चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळवला. 284 वैध मतांपैकी गोयल यांना 48, बोंडे 48, महाडिक 41.56, राऊत 41, प्रतापगढी 44 आणि पटेल यांना 43 मते मिळाली.

सहाव्या जागेसाठी भाजपने माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार हे पराभूत झाले. महाडिक आणि पवार हे दोघेही कोल्हापूरचे आहेत.

"निवडणुका फक्त लढण्यासाठी नाही तर विजयासाठी लढवल्या जातात. जय महाराष्ट्र," असे ट्विट भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी केले, ज्यांनी राज्यसभेसाठी सर्वसंमतीने उमेदवार न देण्यास नकार दिल्याने राज्यात २४ वर्षांनंतर निवडणुका झाल्या, असे ते म्हणाले.

भाजप आणि सत्ताधारी आघाडीकडून क्रॉस व्होटिंगआणि नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारींनंतर आठ तासांच्या विलंबानंतर मतमोजणी सुरू झाली. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी क्रॉस व्होटिंगचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि मते अपात्र ठरवण्याची मागणी केली.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी दिलेले मतदान नाकारण्याचे निर्देश मतदान पॅनेलने महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला दिले, त्यानंतर रात्री 1 नंतर मतमोजणी सुरू झाली. पहिला निकाल दोन तासांत लागला.

या धक्कादायक पराभवानंतर काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील समन्वयातील त्रुटी मान्य केल्या.

चुका काय झाल्या याचा अभ्यास करणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नेमके काय चुकले हा अभ्यासाचा विषय आहे. मतमोजणी थांबवून एक मत अवैध ठरवण्यात भाजपने चतुराई दाखवली. आमचे चारही उमेदवार आरामात जिंकतील, असा आम्हाला विश्वास होता, असे ते नेते म्हणाले.

काँग्रेसचे विजयी उमेदवार इम्रान प्रतापगढ़ी यांनी सांगितले की, आपण आपल्या विजयाने आनंदी आहोत. मात्र शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव दुर्दैवी आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्राच्या चिंता ऐकल्या जातील आणि त्या सोडवल्या जातील याची खात्री राज्यसभेत काम करताना करत राहू. राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड केल्याबद्दल माझ्या सर्व समर्थकांचे आणि हितचिंतकांचे खूप खूप आभार. माझ्यावर ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी माननीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, असे त्यांनी ट्विट केले आहे. तुमच्या पाठिंब्याने मी अत्यंत कृतज्ञ झालो आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्र राज्याच्या समस्या ऐकल्या जातील आणि त्या सोडवल्या जातील यासाठी मी रात्रंदिवस काम करत राहीन, असेही ते म्हणाले.

राऊत यांनी चौथ्या मविआ उमेदवाराच्या पराभवासाठी निवडणूक पॅनेलला जबाबदार धरले. निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले. आम्ही दोन मतांवर आक्षेप घेतला. मात्र त्या मागणीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. निवडणूक आयोगाने भाजपची बाजू घेतली, असा आरोप राऊत यांनी केला.

हेही वाचा : Rajyasabha Election 2022 : राजस्थानमध्ये चालली अशोक गेहलोतांची 'जादू'; काँग्रेसचा 4 पैकी 3 जागांवर विजय

Last Updated : Jun 11, 2022, 8:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details