महाराष्ट्र

maharashtra

Suspected Boat In Raigad हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत Ak 47 सापडल्यानं रायगडमध्ये हायअलर्ट

By

Published : Aug 18, 2022, 2:21 PM IST

Updated : Aug 18, 2022, 10:02 PM IST

Suspected terror boat with AK 47 rifles
Suspected terror boat with AK 47 rifles

रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक संशयास्पद बोट आढळली आहे. त्यामध्ये तीन Ak 47 सापडल्यानं रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला Suspected boat with AK 47 rifles In raigad आहे.

रायगड -रायगडमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीत तीन AK47 बंदुका आढळल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले Suspected boat with AK 47 rifles In raigad आहेत.

संशयास्पद बोट किनाऱ्यावर आणताना

मिळालेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वर किनाऱ्यावरती ही बोट संशयास्पद स्थितीमध्ये समुद्रात होती. त्यानंतर तेथील नागरिकांच्या सहाय्याने ती बोट समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आली. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने, काही घातपाताचा कट होता का?, असा सवाल उपस्थित होतं आहे. दरम्यान, या बोटीमध्ये कोणी चालक अथवा अन्य कोणीही दिसले नाही. दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिल्हात पोलीस प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

याप्रकरणी बोलताना श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी सांगितलं की, रायगडमधील श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर मध्ये शस्त्रे आणि कागदपत्रे असलेली एक बोट आढळली आहे. स्थानिक पोलीस तपास करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांना तातडीने या बोटीच्या चौकशीसाठी एटीएस अथवा राज्य पोलीस दलाची स्पेशल टीम नियुक्त करण्याची मागणी केली आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

तर, महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी सांगितलं की, किनाऱ्यावरील बोट जप्त करण्यात आली आहे. बोटीमधून काही कागदपत्रे मिळाली आहे. आणखी काही गोष्टी बोटीच्या आतमध्ये आहेत, असे त्यांनी म्हटलं.

हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट सध्या सुरक्षित आहे. हा प्रकार दहशतवादी आहे की नाही हे सिद्ध झालेलं नाही, असे कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय मोहितेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Last Updated :Aug 18, 2022, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details