ETV Bharat / city

Devendra Fadnavis हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची, उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

author img

By

Published : Aug 18, 2022, 4:33 PM IST

Updated : Aug 18, 2022, 5:03 PM IST

dcm devendra fadnavis
dcm devendra fadnavis

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वमध्ये संशयास्पद बोट आढळली होती ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं dcm devendra fadnavis on suspected boat found Harihareshwar Beach आहे.

मुंबई - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वमध्ये संशयास्पद बोट आढळली होती. या बोटीत तीन एके-47 बंदुका आढळल्या होत्या. तसेच, त्यामध्ये काही कागदपत्रेही सापडली होती. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याप्रकरणी माहिती दिली आहे. ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. तिचे नाव हाना लॉर्डरगन असे आहे. तिचा पती जेम्स हार्बट हा सदर बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कत वरून युरोपकडे जाणार होती, असे फडणवीस यांनी सांगितलं dcm devendra fadnavis on suspected boat found Harihareshwar Beach आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'नाकाबंदी व हायअलर्ट' - उपमुख्यमंत्री फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, जिल्हा रायगड या किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत मच्छीमारांना सापडली. यासंदर्भात तत्काळ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्या बोटीमध्ये तीन एके रायफल व रायफल दारूगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येत असताच समुद्रकिनाऱ्यावर नाकाबंदी व हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • The boat belongs to an Australian citizen. Boat's engine broke out in the sea, people were rescued by a Korean boat. It has now reached Harihareshwar beach. Keeping in mind the coming festive season, police & administration have been instructed to be prepared: Maharashtra Dy CM https://t.co/L8e9Y8q6al pic.twitter.com/1cM7q6WpuN

    — ANI (@ANI) August 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'बोट ऑस्ट्रेलियन मालकीची' - याबाबत तात्काळ भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांना कल्पना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर बोटीचे नाव लेडीहान आहे. या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेची असून तिचे नाव हाना लॉर्डरगन असे आहे. तिचा पती जेम्स हार्बट हा सदर बोटीचा कप्तान असून, ही बोट मस्कत वरून युरोपकडे जाणार होती. दिनांक २६ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी १ च्या सुमारास कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले. समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान या बोटीचे टोइंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर लागली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड कडून भेटली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

  • There is no confirmation of any terror angle. The boat has just drifted here. We are not ruling out anything, investigating all aspects. Police have been asked to be on high alert: Maharashtra Dy CM Devendra Fadnavis pic.twitter.com/w72QVvV1Z7

    — ANI (@ANI) August 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हालचालींवर बारकाईने लक्ष' - सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस व दहशतवाद विरोधी पथक हे दोघे करत आहेत. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय कोसगाव व केंद्रीय यंत्रणा यांच्याशी सतत संपर्क साधला जात असून, बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - Raigad Suspected Boat हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोटीबाबत महत्वाची माहिती, या देशातील असल्याचे निदर्शनास

Last Updated :Aug 18, 2022, 5:03 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.