महाराष्ट्र

maharashtra

Anil Deshmukh bail plea : अनिल देशमुख जामीन अर्ज सुनावणी पूर्ण 9 मार्च रोजी निकाल

By

Published : Feb 26, 2022, 9:32 AM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 27 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला असून आज अंतिम युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला आहे. न्यायालयाने आज निकाल राखीव ठेवून 9 मार्च रोजी निकाल ( Order on Anil Deshmukh's bail plea ) देणार असल्याचे म्हटले आहे.

अनिल देशमुख
Anil Deshmukh

मुंबई -100 कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ( Order on Anil Deshmukh's bail plea ) अटक केली होती. ईडीने अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी 27 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला असून आज अंतिम युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला आहे. न्यायालयाने निकाल राखीव ठेवून 9 मार्च रोजी निकाल देणार असल्याचे म्हटले आहे.

आज करण्यात आलेल्या ईडी कडून युक्तिवादात अनिल देशमुख यांना जामीन देण्यास सक्त विरोध दर्शवला आहे. अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रथम दर्शनीय आरोपी असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये जामीन दिल्यास या प्रकरणावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद न्यायालयासमोर ईडीकडून करण्यात आला आहे.


ऋषिकेश, सलील देशमुख यांना 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे न्यायालयाचा समन्स -


अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख, दुसरा मुलगा सलील देशमुख यांना आज न्यायालयाने 5 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर राहण्यास संदर्भात समन्स बजवला आहे. ईडीने या दोघांना अनेक समन्स बजावून सुद्धा कार्यालयात चौकशीसाठी न आल्याचा ईडीने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. त्यानंतर आज सुनावणीवेळी न्यायालयाने या दोघांनाही 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा समन्स देण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात 27 जानेवारी रोजी अर्ज करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती.

अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र -

100 कोटी कथित प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 90 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने 7000 पानाचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना देखील सहा आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.



अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख, सलील देशमुख, आरती देशमुख सलील देशमुख, आरती देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने या प्रकरणात वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा कुटुंबिया हा चौकशीला हजर राहिला नाही मात्र याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे या करता ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.


नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.



हेही वाचा-Russia Ukraine Crisis : UNSC मध्ये युक्रेनचा प्रश्न ऐरणीवर; रशियावरील ठरावावर आज मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details