महाराष्ट्र

maharashtra

Nawab Malik Allegations : समीर वानखेडे यांनी दुहेरी ओळख पत्राद्वारे कागदपत्रात घोळ केला - नवाब मलिकांचा नवा आरोप

By

Published : Nov 25, 2021, 3:38 PM IST

Updated : Nov 25, 2021, 5:36 PM IST

Nawab Malik
नवाब मलिक

वानखेडे कुटुंबीयांनी आपली ओळख दुहेरी ठेवली, असे सांगत समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांनीही दुहेरी ओळख ठेवत कागदपत्रांद्वारे घोळ घातला आणि सरकारी नोकरी मिळवली, असा नवीन आरोप नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी केला आहे.

मुंबई -एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी समीर वानखेडे यांच्यावर आता एक नवीन आरोप केला ( Nawab Malik's New Allegations on Sameer Wankhede ) आहे. ज्ञानदेव वानखडे यांच्या पत्नीचे निधन झाले त्या दरम्यान त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दुसरे नाव होते असा आरोप मलिक यांनी लगावला आहे. मुंबई पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'हा' केला नवा आरोप -

ज्ञानदेव वानखेडे यांच्या पत्नीचे निधन झाले, तेव्हा हायकोर्टात दाखल एका प्रकरणात जे प्रतिज्ञापत्र दाखल झाले, त्यात त्यांचे नाव वेगळे होते. तेव्हा वानखेडे कुटुंबीयांनी आपली ओळख दुहेरी ठेवली असे सांगत समीर वानखेडे ह्यांची पण दुहेरी ओळख पत्राद्वारे कागदपत्रात घोळ घातला आणि सरकारी नोकरी मिळवली. असा आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर लगावला आहे. समीर ह्यांच्या आईचे निधन कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये झाले. जर कोण फर्जिवाडा करत असेल तर कारवाई होणारच असेही नवाब मलिक म्हणाले.

सरकार एसटी कामगारांच्या पाठीशी -

एसटी कामगारांच्या आंदोलनाबाबत सुद्धा नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कामगारांना नवीन गाड्या भेटणार आहेत. त्याचबरोबर एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकार करत आहे, असं सांगत एसटी कामगारांची माथी भडकवण्याचे काम काही लोक करत आहेत असा आरोप त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजपला लगावला आहे. सरकार एसटी कामगारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून आता त्यांना सुद्धा ते कळून चुकले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

परमबीर सिंग यांच्या बाबतीत जे काही तथ्य आहे ते कोर्टात मांडले जाईल -

परमबीर ह्यांना फरार घोषित केले आहे. सर्वोच न्यायालयाच्या आदेशाचे पालन सरकार करेल. जे काही तथ्य आहे ते कोर्टात मांडल जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा -न्यायालयाने फरार घोषीत केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत परतले

Last Updated :Nov 25, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details