महाराष्ट्र

maharashtra

समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा हळुहळू पुढे येऊ लागला, नवाब मलिकांचा पुन्हा एनसीबी अधिकाऱ्यावर निशाणा

By

Published : Nov 18, 2021, 11:03 AM IST

Updated : Nov 18, 2021, 1:11 PM IST

समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Nawab Malik
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथक (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांच्या शाळेच्या दाखल्यात त्यांचा धर्म मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. तसेच या दाखल्यामध्ये समीर वानखेडे यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखडे आहे. त्यांचा शाळेचा दाखला आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) सादर केला असून, याबाबत आज दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे. समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्राद्वारे आपण मुस्लिम असल्याचे लपवल्याचा पुनरुच्चार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषदेतून केला.

समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख असल्याचा दावा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडेंनी सादर केलेला दाखला खोटा

सध्या समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जातीचा तसेच जन्माचा दाखला दाखवला जात आहे. तो खोटा असून, 1993 नंतर आपला धर्म लपवण्यासाठी वानखेडे कुटुंबियांकडून खरे दस्तावेज लपवले जात आहे. मात्र त्यांचे सर्व खरे दस्तावेज न्यायालयासमोर ठेवले आहे, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी मलिक यांच्या विरोधात केलेल्या दाव्या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत न्यायालया समोर आम्ही सर्व सत्य समोर आणले, असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.

'समीर वानखेडेंची नोकरी जाणार'

समीर वानखेडेंचे सत्य समोर आल्यावर त्यांची नोकरी जाणार, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच जात पडताळणी विभागाकडील समीर वानखेडे यांचे संदर्भातील सर्व पुरावे आपण सादर करणार असल्याचेही यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.

पहिल्या पत्नीच्या कुटुंबाला धमकी

समीर वानखेडे यांची पहिली पत्नी मुस्लिम असून, त्यांनी समोर येऊन कोणतेही सत्य सांगू नये यासाठी समीर वानखेडे यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना धमकावले जात आहे. तसेच ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात पहिल्या पत्नीच्या चुलत भावाला समीर वानखेडे यांनी अडकवले असल्याचा खळबळजनक दावा हे नवाब मलिक यांनी केला आहे.

अनिल देशमुखांना फसवले जात आहे

परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात मेलद्वारे तक्रार केली. यंत्रणेचा दुरूपयोग केला जात असून अनिल देशमुख यांना गुंतवण्यात आले आहे. आम्हालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी घाबरणार नाही. या सर्व प्रकरणात तक्रारदार हा फरार आहे. हा केवळ राजकीय डाव आहे.

Last Updated : Nov 18, 2021, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details