महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra weather forecast : कोणत्या शहरात किती तापमान, कुठे पडला पाऊस, जाणून घ्या..

By

Published : Jun 30, 2022, 10:54 AM IST

मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने काल ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra weather forecast
हवामान महाराष्ट्र

मुंबई -मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने काल ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, मध्य भारतात मध्य प्रदेश, मध्य आणि पूर्व महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या बहुतांश भागात काल अंशतः ढगाळ आकाश दिसून आले आहे. एस कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये मॉडरेट क्लाउड बँड आढळले आहेत. या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

प्रमुख शहरांचे तापमान -

मुंबई - 26.91 अंश सेल्सिअस

पुणे - 27 अंश सेल्सिअस

औरंगाबाद - 26.11 अंश सेल्सिअस

नागपूर - 29.2 अंश सेल्सिअस

नाशिक - 25 अंश सेल्सिअस

सोलापूर - 25 अंश सेल्सिअस

कोल्हापूर - 24.01 अंश सेल्सिअस

वरील सर्व जिल्ह्यांच्या तापमानाचे निरीक्षण आज पहाटे 8.30 ला झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details