महाराष्ट्र

maharashtra

Eknath Shinde Live Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल, शिवसैनिकांची मोठी गर्दी

By

Published : Jun 22, 2022, 6:14 AM IST

Updated : Jun 22, 2022, 10:42 PM IST

Eknath Shinde live Update
Eknath Shinde live Update

22:39 June 22

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल, शिवसैनिकांची मोठी गर्दी

22:04 June 22

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही सोडले वर्षा निवासस्थान

21:53 June 22

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे यांचे सामान वर्षावरून मातोश्रीवर हलवण्यात येत आहे.

21:24 June 22

गुलाबराव पाटील, योगेश कदम, निर्मला गावित आणि चंद्रकांत पाटील गुवाहाटीमध्ये दाखल

गुलाबराव पाटील, योगेश कदम, निर्मला गावित आणि चंद्रकांत पाटील हे आमदार गुवाहाटीमधील 'रेडीसन ब्लू' हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

21:12 June 22

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडले वर्षा निवासस्थान
  • शिवसैनिकांनीच मोठी गर्दी
  • मातोश्री समोरही मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी

20:49 June 22

आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार पत्रावर सह्या करताना

20:48 June 22

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

20:44 June 22

  • काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेणार आहेत.

20:21 June 22

घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होते - एकनाथ शिंदे

१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.

२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.

३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.

४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

20:03 June 22

  • मुख्ममंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडणार

19:21 June 22

  • राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला असताना एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांना 35 आमदारांच्या सहीचे पत्र देत पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे. मात्र त्या पत्रावर असलेलीय सही ही माझी नाही असं म्हणं बाळापूरचे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांच म्हणणं आहे. ते थोड्याच वेळात अकोला येथे पत्रकार परिषद घेणार असून या संदर्भातही बोलणार असल्याचं त्यांनी दूरध्वनीवर बोलताना सांगितले.

18:24 June 22

शरद पवार, सुप्रिया सुळे वर्षावर दाखल

शरद पवार, सुप्रिया सुळे वर्षा निवासस्थानावर दाखल झाले आहेत. तिथे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

17:49 June 22

  • आमदारांनी माझ्यासमोर येऊन बोलले, तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार - उद्धव ठाकरे

17:43 June 22

  • शस्त्रक्रियेमुळे कोणालाच भेटू शकलो नाही
  • हिंदुत्व हा आमचा श्वास आहे दोन्ही वेगळी होऊ शकत नाही
  • आजारपणात ऑनलाईन काम करत होतो.

17:34 June 22

  • महाराष्ट्राच्या राजकारणात उलटापालट होत असताना नव नवीन घडामोडी समोर येताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना ३४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र पाठवलं आहे. सात पानी पाठवलेल्या पत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदे सोबत आहेत.

16:40 June 22

  • उद्धव ठाकरे पाच वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

16:23 June 22

शिवसेनेचे चार आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सूरतवरून गुवाहाटीला रवाना

योगेश कदम, संजय राठोड, मंजुळा गावित, गोपाळ दळवी हे चार आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सूरतवरून गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

15:46 June 22

भरत गोगावले यांची नियुक्ती अवैध, एकनाथ शिंदेंचे ट्वीट

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

15:02 June 22

शिवसेना नेत्यांची पाच वाजता बैठक; व्हीप जारी

शिवसेना नेत्यांची पाच वाजता बैठक; व्हीप जारी

14:49 June 22

मी उद्धव ठाकरेंसोबत - आमदार नितीन देशमुख

100-150 पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले आणि माझ्यावर हल्ला झाल्याची बतावणी केली. त्यांना माझ्यावर शस्त्रक्रिया करायची होती, त्या बहाण्याने माझे नुकसान करायचे होते. देवाच्या कृपेने मी ठीक आहे, मी उद्धव ठाकरेंसोबत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे.

14:16 June 22

सध्या तरी आम्ही शिवसेना किंवा मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा नाही - एकनाथ शिंदे

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मी म्हणेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि यापुढेही शिवसैनिक राहू. सध्या तरी आम्ही शिवसेना किंवा मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा करत नाही आहोत. आम्ही भविष्यातील कृतीबाबत निर्णय घेतलेला नाही, असे एकनाथ शिंदे यांनी एएनआयला सांगितले.

14:11 June 22

सध्या आमच्याकडे 46 आमदार.. एकनाथ शिंदेंनी सांगितला समर्थकांचा आकडा

सध्या आमच्यासोबत 6-7 अपक्ष आमदारांसह 46 आमदार आहेत. बाकीचे शिवसेनेचे आमदार आहेत. हा आकडा येणाऱ्या काळात वाढेल. आत्तापर्यंत आम्हाला भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नसल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी एएनआयला सांगितले.

14:04 June 22

महाराष्ट्राचे तीन आमदार सुरतमध्ये पोहोचले, एक आमदार आणखी पोहोचणार आहे

महाराष्ट्राचे तीन आमदार सुरतमध्ये पोहोचले. एक आमदार आणखी पोहोचणार आहे.

14:03 June 22

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला पूर्ण पाठिंबा देईल - कमलनाथ

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला पूर्ण पाठिंबा देईल. माझे शरद पवार यांच्याशीही बोलने झाले होते. त्यांनीही मला सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत राहील. मला खात्री आहे की शिवसेनेचे बंडखोर शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंक लावणार नाहीत, असे महाराष्ट्र काँग्रेसचे निरीक्षक कमलनाथ म्हणाले.

13:55 June 22

शिवसेनेने सर्व आमदारांना आज संध्याकाळी 5 वाजता बैठकीला बोलावले

शिवसेनेने सर्व आमदारांना आज संध्याकाळी 5 वाजता बैठकीला बोलावले.

13:54 June 22

मंत्रिमंडळाची बैठक संपली, अकरा विषयावर झाली चर्चा

मंत्रिमंडळाची बैठक संपली. अकरा विषयावर चर्चा झाली. सर्व प्रस्ताव मंजूर

13:52 June 22

आमदारांना प्रलोभन, मारहाण दुर्दैवी - संजय राऊत

माझं आज सकाळी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले. एकट्या एकनाथ शिंदे यांच्याकडून नियोजन शक्य नाही. आमदारांना प्रलोभन, मारहाण दुर्दैवी आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

13:40 June 22

उद्धव ठाकरेंच्या राजिनाम्याचे संकेत

उद्धव ठाकरेंच्या राजिनाम्याचे संकेत. सायंकाळी पाच वाजता आमदार खासदारांची बैठक.

13:25 June 22

उदय सामंत, दादा भुसे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर

उदय सामंत, दादा भुसे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर

13:21 June 22

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, मुख्यमंत्री ऑनलाईन बैठकीला उपस्थित

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाले - CMO

13:18 June 22

माझी प्रकृती खराब झाली नव्हती, आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट

अकोलाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख परत नागपुरात दाखल. माझी प्रकृती खराब झाली नव्हती, असा गौप्यस्फोट त्यांनी नागपूर विमानतळावर केला. मला पोलिसांनी दवाखान्यात दाखल केले, माझ्यावर उपचार करण्यात आले. मी आताही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे, असा दावा त्यांनी केला.

13:14 June 22

उद्धव ठाकरे म्हणाले विधानसभा विसर्जित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - कमलनाथ

मुंबई - मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे आणि ते म्हणाले की सध्या महाराष्ट्र विधानसभा विसर्जित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, काँग्रेस नेते कमलनाथ यांची माहिती.

13:12 June 22

अ‍ॅन्टिजन चाचणीत उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

अ‍ॅन्टिजन चाचणीत उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह.

13:09 June 22

महाविकास आघाडी सरकारला काही धोका नाही- नाना पटोले

मुंबई -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले म्हणाले, की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार बरखास्तीचा कुठलाही प्रस्ताव असणार नाही आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. सध्या तरी महाविकास आघाडी सरकारला काही धोका नाही.

13:03 June 22

मंत्री अनिल परब आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ईडीसमोर होणार हजर

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री अनिल परब आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ईडीसमोर हजर होणार आहेत. त्यांना आज एजन्सीने समन्स बजावले होते आणि सकाळी 11 वाजता ते त्यांच्यासमोर हजर होणार होते.

12:49 June 22

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत एकजूट राहील-कमलनाथ

मुंबई - 44 पैकी 41 आमदार या बैठकीला उपस्थित होते. तर 3 वाटेत आहेत. भाजपने जे राजकारण सुरू केले ते पैसे आणि मसल पॉवरचे आहे. जे संविधानाच्या विरोधात आहे. मी हे खूप पाहिले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत एकजूट राहील, असे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितले.

12:45 June 22

उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह नाही, कमलनाथ आपल्या विधानापासून पलटले

उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह नाही, कमलनाथ आपल्या विधानापासून पलटले

12:40 June 22

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाची झाली बैठक

राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाची बैठक झाली.

12:37 June 22

एकनाथ खडसेंविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेचे आंदोलन, महिला कार्यकर्त्या भावूक

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करणारे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनात करताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या भावूक झाल्या.

12:31 June 22

गेहलोत यांची भाजपवर टीका, घोडेबाजार करून सरकार पाडत असल्याचा केला आरोप

त्यांनी प्रत्येक गोष्टीची मजाक करून ठेवली आहे. ते षडयंत्र रचत होते आणि सुरुवातीपासूनच महाराष्ट्राला टार्गेट करत होते. पण आता ते उघडकीस आले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी अहंकारी राहू नये आणि राज्यघटनेनुसार देश चालवला पाहिजे. हिंदुत्वाच्या नावाखाली देशात लोकशाही ढासळत चालली आहे. लोकांना आता कळत नाही पण नंतर पश्चाताप होईल. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नाजूक असताना आणि अर्थव्यवस्था कमकुवत असताना हे (भाजप) लोक घोडेबाजार करत आहेत आणि सरकार पाडत आहेत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले.

12:29 June 22

मध्यावधी निवडणुकीवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही - छगन भुजबळ

मध्यावधी निवडणुकीवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मी काय म्हणू? महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया.

12:26 June 22

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुपारी 1 वाजता बैठक

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुपारी 1 वाजता बैठक.

12:21 June 22

राजकीय भुकंप असताना ईडीची कारवाई, मुंबईत 6 ठिकाणी छापेमारी

मुंबईत ईडीकडून 6 ठिकाणी छापेमारी. एका बँक घोटाळा प्रकरणात छापेमारी सुरू असल्याची माहिती. राज्यात राजकीय भूकंप झालेला असताना ईडी ऍक्शन मोडमध्ये. ईडीकडून बँक घोटाळा प्रकरणात छापा सुरू असल्याची माहिती.

12:17 June 22

पंतप्रधान तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथला घेऊन गेले - छगन भुजबळ

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान पंढरपूरला तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथला घेऊन गेले. मार्ग काढण्यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा करू. संजय राऊत यांचे ट्विट पाहिले. काय होते ते बघू या. निवडणुका उद्या दे, मध्यवर्ती लागू दे, काही फरक पडत नाही. कार्यकर्त्याने नेहमीच निवडणुकीसाठी तयार असायला हवे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

12:12 June 22

आमच्याकडे संख्याबळ किती आहे हे सांगता येणार नाही- अरविंद सावंत

मुंबई- आमच्याकडे संख्याबळ किती आहे हे सांगता येणार नाही, असे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचेही त्यांनी सांगितले. संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेची बैठक होणार आहे.

12:02 June 22

सुप्रिया सुळे आणि रामराजे निंबाळकर यांचे वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये आगमन

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि रामराजे निंबाळकर यांचेही मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये आगमन.

11:52 June 22

शरद पवार मुंबईतील वायबी चव्हाण केंद्रात पोहोचले, राजकीय खलबत होण्याची शक्यता

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतील वायबी चव्हाण केंद्रात पोहोचले. प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब पाटील यांनी आज सकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

11:44 June 22

विधानसभा भंग होण्याची शक्यता - संजय राऊत यांचे संकेत

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे.

11:36 June 22

संपत्तीवर चालणारे राजकारण भारताच्या राज्यघटनेच्या विरोधी- कमलनाथ

मुंबई- झारखंड आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये संपत्तीवर चालणारे राजकारण भारताच्या राज्यघटनेच्या विरोधी आहे. अशा राजकारणाचा उदय भविष्यासाठी धोकादायक आहे. महाराष्ट्रासाठी असलेले काँग्रेस निरीक्षक कमलनाथ यांनी म्हटले आहे.

11:32 June 22

'जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल; पण लक्षात ठेवा गेलेली सत्ता पुन्हा येते' संजय राऊत यांचा इशारा नेमका कोणाला ?

मुंबई -सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील विजयाचा गुलाल सुकतो न सुकतो तोच एक कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक 22 आमदारांना सोबत घेत सुरत गाठली. शिवसेनेच्या अंतर्गत नाराजी नाट्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्प मतात येऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील या सत्ता नाट्यावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

11:30 June 22

मुंबईत शिवसेनेची पोस्टरबाजी सुरु

मुंबईत शिवसेनेची पोस्टरबाजी सुरु

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संयमाने वागणाऱ्या शिवसैनिकांचा आता संयम सुटू लागला आहे. शिवसेनेच्या वतीने पोस्टरबाजी सुरु झाली आहे.

Body:२२ जून मुंबई

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. मात्र काल दिवसभरात संयम न सुटलेल्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदे आता परतणार नाही, हे जवळपास निश्चित झाल्यानंतर संयम सुटू लागला आहे. शिवसेनेचा भांडुपच्या नगरसेविका दीपमाला बडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर भलेमोठे पोस्टर लावले आहे.

11:00 June 22

थोड्याच वेळात काँग्रेस आमदारांची बैठक होणार सुरू- वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी पोहोचले

मुंबई- वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ हे काँग्रेस आमदारांच्या बैठकीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॅायल स्टोन निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे.

10:48 June 22

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी बोलणी सुरू- संजय राऊत

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी बोलणी सुरू असून, सर्वजण शिवसेनेतच राहणार आहेत. आमचा पक्ष लढवय्या आहे, आम्ही सातत्याने संघर्ष करू, आमची सत्ता गेली तरी चालेल पण आम्ही लढत राहू, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे आमचे जुने पक्षाचे सदस्य आहेत, ते आमचे मित्र आहेत. आम्ही अनेक दशके एकत्र काम केले आहे. त्याच्यासाठी किंवा आपल्यासाठी एकमेकांना सोडणे सोपे नाही. आज सकाळी मी त्यांच्याशी तासभर चर्चा केली आणि त्याबाबत पक्षप्रमुखांना कळविल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

09:55 June 22

दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, सह्याद्री अतिथीगृहात बैठक होण्याची शक्यता

मुंबई- आजदुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हेदेखील उपस्थित असणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात बैठक होण्याची शक्यता आहे.

09:48 June 22

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची गुवाहाटीत बैठक

मुंबई - बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली आहे. या बैठकीत आमदार एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड करण्यात येणार असल्याची समजते.

09:22 June 22

एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव आला तर विचार करू-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

पुणे- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारण हे चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बळ देणारी विधाने भाजपमधून केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचा युतीचा प्रस्ताव आला तर त्याचा विचार करू, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

09:11 June 22

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह आज राज्यपालांना भेटणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

08:45 June 22

ईडीच्या रडारवर असलेले हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत!

मुंबई- केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले शिवसेनेचे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंतराव जाधव यांची पत्नी यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक हे देखील बंडखोर आमदारांच्या यादीत आहेत.

08:36 June 22

गुरूची विद्या गुरूला ? नितीन सरदेसाई यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की नेहमीच 'Not Reachable' असणार्‍या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार आता 'Not Reachable आहेत. गुरुची विद्या गुरुला असल्याचे नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

08:33 June 22

शिवसेना सोडण्याचा व दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय नाही- एकनाथ शिंदे

मुंबई- शिवसेना सोडण्याचा व दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय नाही. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. जनतेच्या भावना घेऊन पुढे जात आहोत. प्रतारणा करणार नसल्याचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले.

08:12 June 22

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर मोठी राजकीय उलथापालथ, राज्याच्या मंत्रिमंडळाची दुपारी १ वाजता होणार बैठक

मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला सुमारे ३२ आमदारांसह पोहोचले आहेत. त्यांच्या नाराजीनंतर राज्यात मोठी राजकीय आलथापालथ होत आहेत. अशा परिस्थितीत राज्याच्या मंत्रिमंडळाची दुपारी १ वाजता बैठक होणार आहे.

07:51 June 22

४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणारे बंडखोर नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र गट स्थापन करणार?

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पत्र तयार केले असून बंडखोर आमदारांच्या स्वाक्षरी त्यावर घेण्यात आल्याचे समजते. ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी गुवाहाटीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

07:44 June 22

बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे हे आसाममधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोहोचले

गुवाहाटी- बंडखोर आमदार हे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आसाममधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी हॉटेलभोवती तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

07:18 June 22

वैयक्तिक संबंधामुळे शिवसेनेच्या आमदारांना घ्यायला आलो- भाजपचे आमदार सुशांत बारगोहेन

गुवाहाटी- गुवाहाटी विमानतळावर शिवसेनेच्या आमदारांना घेण्यासाठी भाजपचे आमदार सुशांत बारगोहेन आले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वैयक्तिक संबंधामुळे शिवसेनेच्या आमदारांना घ्यायला आलो आहे. मी आमदार मोजलेले नाहीत. मी वैयक्तिक संबंधामुळे आलो आहे. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाची माहिती दिलेली नाही.

06:41 June 22

४० आमदार आमच्यासोबत आहेत, बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही चालविणार आहोत - एकनाथ शिंदे

गुवाहाटी- बंडखोर आमदारांसह शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुवाहाटी विमानतळावर पोहोचले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की आम्ही ४० आमदार आहोत. आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व चालविणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

06:38 June 22

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण आहेत आमदार, ही पहा यादी

मुंबई -शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोटोत ३२ आमदार दिसून आले आहेत. त्यांची नावे समोर आली आहेत.

कोण आहेत ते आमदार?

1 महेंद्र थोरवे

2 भरत गोगावले

3 महेंद्र दळवी

4 अनिल बाबर

5 महेश शिंदे

6 शहाजी पाटील

7 शंभूराज देसाई

8 बालाजी कल्याणकर

9 ज्ञानराजे चौघुले

10 रमेश बोरणारे

11 तानाजी सावंत

12 संदिपान भुमरे

13 अब्दुल सत्तार

14 नितीन देशमुख

15 प्रकाश सुर्वे

16 किशोर पाटील

17 सुहास कांदे

18 संजय शिरसाट

19 प्रदीप जयस्वाल

20 संजय रायुलकर

21 संजय गायकवाड

22 एकनाथ शिंदे

23 विश्वनाथ भोईर

24 राजकुमार पटेल

25 शांताराम मोरे

26 श्रीनिवास वनगा

27 प्रताप सरनाईक

28 प्रकाश अबिटकर

29 चिमणराव पाटील

30 नरेंद्र बोंडेकर

31 लता सोनावणे

32 यामिनी जाधव

33 बालाजी किनीकर

06:01 June 22

आमच्याकडे संख्याबळ किती आहे हे सांगता येणार नाही- अरविंद सावंत

मुंबई -शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदार सुरत विमानतळावर चार्टर्ड विमानाने गुवाहाटी पोहोचले आहेत. दिवसभराच्या नाट्यमय घडामडीनंतर सर्व बंडखोर आमदारांना ट्रॅव्ह्ल्सच्या तीन बसच्या माध्यमातुन रात्री 2.15 च्या सुमारास सुरत विमानतळावर नेण्यात आले. तेथुन चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला नेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांच्या माध्यमातुन समोर आली आहे. तीन ट्रॅव्हल्सनेआमदारांना हॉटेलवरुन नेण्यात आले.

आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी व सेनेचे काही पदाधिकारी सुरतकडे रवाना झाले होते. त्यांच्या पत्नी प्राजंली देशमुख यांनी म्हटले होते, की मला खूप काळजी वाटते. तिथे मंत्र्यांना निघता येत नाही. त्यामुळे मी स्वतः सुरतला निघत आहे. आता सुरतला मला जायचं आहे. सुरतला काही कोणी रोखले तरी मी जाणारच आहे. काहीही परिस्थिती झाली तरी मी सुरतला जाईल, असं त्या म्हणाल्या. त्या आणि काही सेनेचे पदाधिकारी हे दुपारी सुरतसाठी रवाना झाले होते.

एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह परत येतील अशी आपल्याला खात्री" असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक सायंकाळी वर्षा निवासस्थानी बोलावली होती.

Last Updated : Jun 22, 2022, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details