महाराष्ट्र

maharashtra

Kangana In Court : जावेद अख्तर यांच्या याचिकेप्रकरणी कंगना न्यायालयात हजर

By

Published : Jul 4, 2022, 9:05 PM IST

अभिनेत्री कंगना रणौत ( Actress Kangana Ranaut ) विरोधात गीतकार जावेद अख्तर ( Lyricist Javed Akhtar ) यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातील याचिकेवरील ( Petition in defamation case ) सुनावणी दरम्यान आज दिनांक 4 जुलै रोजी कंगना रणौत अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाली. गेल्या अनेक सुनावणीवेळी कंगना रणौत उपस्थित राहात नसल्याने तिच्या विरोधात वॉरंट काढण्यात यावा, अशी मागणी देखील जावेद अख्तर यांच्याकडून करण्यात आली होती.

javed kangana
javed kangana

मुंबई -जावेद अख्तर ( Lyricist Javed Akhtar ) यांच्याकडून करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याकडून माझी बदनामी करण्यात आली आहे. मात्र, मी कुठल्याही प्रकारची बदनामी केली नसल्याचे कंगना रणौत ( Actress Kangana Ranaut ) हिने न्यायालयात सांगितले. अख्तर यांच्या बदनामीच्या याचिकेत कंगना रणौत दोषी नाही, अशी बाजू तिच्या वकिलांनी मांडली आहे. कंगना विरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सदर मानहानी याचिकेवरील सुनावणी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टासमोर न करता इतर कोर्टात स्थानांतरित करण्यात यावी यासाठी कंगनाने सेशन कोर्टात धाव घेतली होती. याआधी देखील किल्ला कोर्ट आणि आता सत्र न्यायालयाकडून कंगनाची मागणी फेटाळली होती.


काय आहे प्रकरण - नोव्हेंबर 2020 मध्ये जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली होती. आपल्या तक्रारीत अख्तर यांनी म्हटले आहे की, एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौत हिने त्यांची बदनामी केल्याची विधाने केली आहेत. जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील सहयोगीचा उल्लेख करताना रणौतने टीव्ही मुलाखतीदरम्यान त्यांचे नाव ओढले, असा दावा अख्तर यांनी केला होता.


दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. तेव्हाच गीतकार जावेद अख्तर यांच्याविषयी कंगनाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाने माझी विनाकारण मानहानी केली आणि त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, असा आरोप जावेद अख्तर यांनी कंगनावर केला. त्यानंतर अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी करण्यात आली आणि त्यानंतर न्यायालयाने 1 मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केला. मागील 8-9 महिन्यांपासून हा खटला प्रलंबित आहे. मी सतत शुटींगनिमित्ताने बाहेर असते. त्यामुळे मला सतत सुनावणीसाठी मुंबईत येता येणार नाही. म्हणून या प्रकरणातील इतर सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी कंगनाने मागणी केली होती. मात्र, दोन्ही वेळेस कंगनाची मागणी फेटाळण्यात आली.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details