महाराष्ट्र

maharashtra

Gunaratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

By

Published : Apr 9, 2022, 5:54 PM IST

Updated : Apr 9, 2022, 9:24 PM IST

शरद पवार (Sharad Pawar House Protest) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Police Custody) यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Gunaratna Sadavarte
वकील गुणरत्न सदावर्ते

मुंबई -शरद पवारयांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी (Sharad Pawar House Protest) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Police Custody) यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किला कोर्टात याबाबत आज सुनावली झाली. गुणरत्न सदावर्ते यांना सध्या LTT मार्ग पोलीस स्टेशममध्ये ठेवण्यात येणार आले. तसेच सदावर्ते यांना चौकशीसाठी गावदेवी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतात. तर ST कर्मचाऱ्यांना आज येलो गेट पोलीस स्टेशममध्ये ठेवणार आहेत. उद्या रविवारी असल्याने उद्याही जेलमध्ये पाठवणार नाहीत. आता सोमवारी कर्मचाऱ्यांना जेलमध्ये नेले जाणार आहे.

१४ दिवसांची पोलीस कोठडीची होती मागणी -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱयांनी आंदोलन करत हल्ला केला होता. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० आरोपीना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होता. न्यायमूर्ती सावंत यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. यानंतर सदावर्ते यांच्यासह सर्व आरोपींची चौकशी कारण्याची गरज असल्याने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व महेश वासवानी यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने प्रदीप घरत यांनी बाजू मांडली.

माझी हत्या केली जाऊ शकते - गुणरत्न सदावर्ते :गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस ठाण्यातून कोर्टात घेऊन जात असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझी हत्या केली जाऊ शकते, तसेच हा लोकशाहीचा गळा घोटल्याचा प्रकार असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया

सदावर्ते यांची बाजू -ज्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी सदावर्ते त्याठिकाणी नव्हते. ते मॅट कोर्टात हजर होते. गुणरत्न हे उच्च शिक्षित आहेत, त्यांच्या घरावर हल्ला झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पवार यांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी जखमी झालेल्या पोलिसांचा रिपोर्ट का नाही? सदावर्ते यांचा या हल्ल्यात सहभाग नाही, अशी बाजू महेश वासवाणी यांनी मांडली आहे. आंदोलन दरम्यान जय श्री रामचे नारे लगावले यामुळे सरकार नाराज असल्याचे वासवाणी यांनी म्हटले आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी आणि डॉ आंबेडकर यांच्या विचारांवर चालायला शिकवले. एफआयआरमध्ये आरोपी पुरावे नष्ट करेल असे कुठेही म्हटले नाही, त्यामुळे त्यांना जामीन द्या, अशी मागणी वासवाणी यांनी केली.

कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत - एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली. कर्मचाऱ्यांचा उद्देश समजून घ्या, कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत, असे त्यांनी कोर्टाला संगितले. यावेळी महिला आरोपींना कोर्टाने, तुम्हाला पोलिसांनी त्रास दिला का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नसल्याचे महिला आरोपींनी सांगितले.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद -सर्व कामगारांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत. काहींनी मद्यपान केल्याचा संशय पोलिसांना असल्याने हे नमुने घेतले असून, ते नमुने कलिना येथील वैद्यकिय प्रयोग शाळेत पाठवण्यातआले आहेत. कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱया ४ जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्व प्रकारामागे सदावर्ते हे एकटे नसून, अन्य जणांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे. रक्ताच्या नमुन्यांचाअहवाल येण्यास ३ ते ४ दिवस लागतील. आरोपींची संख्या मोठी असल्याने चौकशी करायला वेळ लागत आहे. आरोपींनी तेथील अनेक गोष्टींचे नुकसान केले आहे, त्याचे सीसीटीव्हीही आहेत. आरोपीची भाषा ही कुणीतरी बोलायला लावणारी होती. त्यामुळे नक्कीच त्यांना भडकवले असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. हे सर्व सुनियोजित होते, आरोपींनी माध्यमांना दिलेली भाषणे पाहिली तर अनेक गोष्टी स्पष्ठ होताना दिसत आहेत. या घटनेत दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांवर चप्पल, दगड मारले आहेत. एका पोलिसाला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. अटक केलेले आरोपी तपासाला सहकार्य करत नाहीत. चुकीची नावे सांगत आहेत. यावर असाही संशय येतो की हे खरंच ST कामगार आहेत? गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे.

Last Updated :Apr 9, 2022, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details