ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte Arrested : शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन; गुणरत्न सदावर्तेंना अखेर अटक

author img

By

Published : Apr 8, 2022, 8:35 PM IST

Updated : Apr 8, 2022, 10:35 PM IST

gunaratna sadavarte
gunaratna sadavarte

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलना प्रकरणी मुंबई पोलिसांनी 106 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली (Gunaratna Sadavarte Arrested By Mumbai Police) आहे. रात्री उशिरा सदावर्ते यांना कलम 353 आणि 120B अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

मुंबई - मागील काही काळापासून आझाद मैदानावर आंदोलन करणारे एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी (ST Worker Protest Sharad Pawar) आंदोलन केले होते. मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी आता एसटी कर्माचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक (Gunaratna Sadavarte Arrested) केली आहे. याप्रकरणी 107 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरुवातीला गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले (Gunaratna Sadavarte Detained By Mumbai Police) होते. त्यानंतर रात्री उशीरा सदावर्ते यांना कलम 353 आणि 120B अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

वकील जयश्री पाटील

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी चपला आणि बाटल्याही फेकल्या होत्या. त्या प्रकरणी 107 एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 107 आरोपींमध्ये 23 महिलांचा समावेश आहे. तर, वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी त्यांच्या परळ येथील घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना कलम 353 आणि 120B अंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात घेऊन जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाई करण्याचे निर्देश - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे. तसेच या घटनेला प्रत्युत्तर म्हणून कोणीही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशी कृती करू नये. एसटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सरकार सदैव पाठीशी राहील, असेही मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

शनिवारी न्यायालयात हजर करणार - आरोपी असलेल्या 106 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेडिकल चाचणीसाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेले आहेत. त्यानंतर उद्या गिरगांवातील सत्र न्यायालायत हजर करण्यात येणार आहे.

चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई करा - अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून त्याने घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना गृहमंत्र्यांना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न - एसटी कर्मचारी पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यांनी ब्रीड कॅन्डी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवार सिल्व्हर ओकवर उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घरातून बाहेर पडत एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शांततेचं आवाहन केलं. एसटी कर्मचारी आक्रमक होते. सुप्रिया सुळे यांनाही घेरण्याचा यावेळी प्रयत्न झाला. शेवटी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना एका शाळेच्या बसमधून जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा - Silver Oak Attack : शरद पवारांच्या घरावर हल्ला.. फडणवीस, दरेकर, आठवले, चंद्रकांत पाटील, शेलार म्हणाले..

Last Updated :Apr 8, 2022, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.