ETV Bharat / entertainment

रणवीर सिंग स्टारर 'राक्षस' चित्रपट कायमस्वरुपी रखडला, निर्मात्यांनी जारी केलं निवेदन - Ranveer Singh Rakshas Update

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 3:11 PM IST

Ranveer Singh Rakshas Update: बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांचा आगामी 'राक्षस' चित्रपट थांबवण्यात आला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रणवीर सिंग आणि दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या आगामी 'राक्षस' चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे. अलीकडेच रणवीर सिंगनं निर्मात्यांसह एक निवेदन जारी केले की, हा चित्रपट सध्या बनत नाही. निवेदनात म्हटलं आहे की, रणवीर आणि प्रशांत सर्जनशील मतभेदांमुळे या चित्रपटापासून वेगळे झाले आहेत. त्यांच्या चित्रपटाचं नाव होतं 'राक्षस'. तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय प्रोडक्शन हाऊस मैत्री मुव्ही मेकर्सच्या बॅनरखाली हा बिग बजेट चित्रपट बनवला जाणार होता.

'Rakshas' has been shelved permanently, the makers have issued a statement
'राक्षस' निर्मात्यांचं अधिकृत निवेदन ((IMAGE- Rakshas Makers))

'राक्षस' निर्मात्यांचं अधिकृत निवेदन

मैत्री मुव्ही मेकर्सने त्यांच्या नवीन रक्षास या चित्रपटाबद्दल एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. मेकर्सनी दिलेल्या निवेदनात राक्षस फिल्मबद्दल माहिती देताना म्हटलं आहे की, 'राक्षस हा चित्रपट प्रशांत वर्मा दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा अलीकडे पसरली होती. ज्या पॉवरहाऊस चित्रपटामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता, त्या दोघांनीही सर्जनशील मतभेदांमुळे या प्रकल्पातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

निवेदनात असे लिहिले आहे की, 'इंडस्ट्रीतील विविध चर्चेच्या दरम्यान, निर्माते आणि रणवीर सिंगनं आता त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत वर्मा, मैत्री मूव्ही मेकर्स आणि रणवीर सिंग यांनी आता त्यांच्या अधिकृत निवेदनासह स्पष्टीकरण दिलं आहे. याबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाला, "प्रशांतकडे खूप खास टॅलेंट आहे. आम्ही एकत्र भेटलो आणि चित्रपटाच्या कल्पनेवर चर्चा केली. आशा आहे की आम्ही भविष्यात काही रोमांचक कामांसाठी एकत्र काम करु."

आपल्या निवेदनात दिग्दर्शक प्रशांत वर्मा म्हणाला, 'रणवीरची ऊर्जा आणि प्रतिभा शोधणं दुर्मिळ आहे. भविष्यात आम्ही लवकरच एकत्र येऊन काम करु. मैत्री मुव्ही मेकर्सला वाटत की, रणवीर सिंग आणि प्रशांत वर्मा या दोघांच्याही बाजू रास्त आहेत. परंतु काहीवेळा गोष्टी ज्या वेळी घडल्या पाहिजेत त्या वेळी होत नाहीत. भविष्यात एकत्र काम करण्याचे आश्वासन दोघांनीही दिलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'राक्षस'ची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित होती. गेल्या काही आठवड्यांपासून हा चित्रपट बंद झाल्याच्या अफवा येत होत्या. अखेर निर्मात्यांनी या अफवांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा -

"कोण होतीस तू काय झालीस तू...": 'हिरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरीचा जुना लूक पाहून लोक आश्चर्यचकित - Aditi Rao Hydari old look

'ऑल आइज ऑन रफाह'ला आधी पाठिंबा देऊन पोस्ट डिलीट केल्याबद्दल माधुरी दीक्षित झाली ट्रोल - All Eyes on Rafah

अनन्या, सारा आणि जान्हवी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी रवाना - Anant Radhika Pre wedding - Anant Radhika Pre wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.