ETV Bharat / entertainment

"कोण होतीस तू काय झालीस तू...": 'हिरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरीचा जुना लूक पाहून लोक आश्चर्यचकित - Aditi Rao Hydari old look

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 12:17 PM IST

Aditi Rao Hydari old look: 'हिरामंडी' या संजय लीला भन्साळींच्या मालिकेची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचे दोन फोटो व्हायरल झाले आहेत हे फोटो पाहिल्यानंतर युजर्स म्हणत आहेत, "कोण होतीस तू काय झालीस तू..."

Aditi Rao Hydari
अदिती राव हैदरी (Image grab from Hiramndi poster)

मुंबई - Aditi Rao Hydari old look : आजकाल आदिती राव हैदरी ही संजय लीला भन्साळी यांच्या ओटीटी पदार्पणाची आणि आत्तापर्यंतची सर्वात महागडी वेबसीरिज 'हीरामंडी - द डायमंड बझार' या मालिकेसाठी चर्चेत आहे. या मालिकेत आदिती 'बिब्बाजान'ची भूमिका साकारत आहे. दरम्यान, अदिती राव हैदरी हिच्या चेहऱ्याच्या बदलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अदिती राव हैदरीचे चाहते तिच्यात झालेला बदल पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आदिती राव हैदरीच्या परिवर्तनाच्या फोटोंवर कमेंट येऊ लागल्या आहेत.

अदिती राव हैदरी यांच्या परिवर्तनापूर्वीच्या फोटोने अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अदिती तिच्या चेहऱ्याच्या बदलापूर्वीच्या फोटोमध्ये ओळखू येत नाही. हा फोटो सुमारे १८ वर्षे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. आता आदिती राव हैदरी 37 वर्षांची आहे आणि त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. आता आदितीचे चाहते स्वत: तिच्या दिसण्याबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिच्यात्रीबद्दल म्हणत आहेत की तिनं प्लास्टिक सर्जरी केली आहे.

अदिती राव हैदारीच्या या 18 वर्षापूर्वीच्या फोटोतील लूकची आजच्या चेहऱ्याशी तुलना केली तर ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. 18 वर्ष जुन्या फोटोत आदिती राव हैदरी एका मावशीसारखी दिसत आहे. हे आम्ही नाही तर युजर्सच तिच्या परिवर्तनाच्या व्हायरल फोटोवर लिहित आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'तू असं काय खाल्लं आहेस?' तर अनेक युजर्सचा या बदलावर विश्वासच बसत नाही. बऱ्याच जणांनी केलेल्या कमेंट्सचा रोख तिच्यात झालेल्या बदलावर आश्चर्य व्यक्त करणारा आहे. कोण होतीस तू काय झालीस तू..असाच सूर सर्वांच्या प्रतिक्रियांचा आहे.

आदिती राव हैदरीनं 2006 मध्ये मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. हा साऊथचा सुपरस्टार मामूट्टी बरोबर तिचा चित्रपट होता. आदितीने 2011 मध्ये 'ये साली जिंदगी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर अदितीला अनेक चित्रपटांमध्ये केवळ सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळाल्या आहेत.

हेही वाचा -

  1. 'ऑल आइज ऑन रफाह'ला आधी पाठिंबा देऊन पोस्ट डिलीट केल्याबद्दल माधुरी दीक्षित झाली ट्रोल - All Eyes on Rafah
  2. अनन्या, सारा आणि जान्हवी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीसाठी रवाना - Anant Radhika Pre wedding - Anant Radhika Pre wedding
  3. नरेंद्र मोदी विजय होतील का? हिमालयात जाण्यापूर्वी रजनीकांतनं दिलं उत्तर, काय ते जाणून घ्या... - Rajinikanth

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.