महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole Allegations : विधान परिषद निवडणूक; केंद्रीय तपास यंत्रणेकडून आमदारांना फोन, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

By

Published : Jun 18, 2022, 1:21 PM IST

विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार असून त्यांचा एक उमेदवार जिंकून आल्यानंतर दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेस पक्षाला दहा मतांची गरज भासणार आहे.

Congress State President Nana Patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप ( Nana Patole Allegations ) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना फोन करुन त्यांच्यावर दबाव ( Central Agency Call To MLA ) टाकला जात असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. याबाबतचे सर्व पुरावे आपण योग्य वेळी समोर आणू असा दावाही नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर -विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेस आमदारांची आज सायंकाळी बैठक होणार असून, या बैठकीनंतर या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये रवाना केले जाईल. मात्र ही निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप नाना पटोलेकडून करण्यात आला आहे. आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी हा आरोप केला आहे.

काँग्रेस आमदारांची सायंकाळी बैठक -विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसकडे 44 आमदार असून त्यांचा एक उमेदवार जिंकून आल्यानंतर दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेस पक्षाला दहा मतांची गरज भासणार आहे. यासाठी महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते बसून रणनीती आखणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details