महाराष्ट्र

maharashtra

केंद्राने 'आयएफसी' स्थलांतरित करण्याचा निर्णय मागे घ्यावा - अरविंद सावंत

By

Published : May 2, 2020, 9:23 PM IST

मुंबई बिकेसीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सरकारने महाराष्ट्रच्या वर्धापनदिनीच गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र येथून केंद्र स्थलांतर करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. याला सबका साथ सबका विकास म्हणता येणार नाही, अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली.

Arvind Sawant
अरविंद सावंत

मुंबई - मुंबईतील बिकेसीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (आयएफसी सेंटर) केंद्र सरकारने महाराष्ट्रच्या वर्धापनदिनीच गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला. ही एकूणच वेदनादायी गोष्ट आहे. केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

अरविंद सावंत

मुंबईतील बिकेसी येथून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हलवू नका असा आग्रह शिवसेनेने केंद्र शासनाला केला होता. मी 2015 ला याबाबत लोकसभेत मागणी केली होती, मात्र त्या मागणीकड़े दुर्लक्ष केले गेले. केंद्र सरकारने मुंबईतून काय काय गुजरातला नेले याचा पाढ़ा तेव्हा लोकसभेत वाचून दाखवला होता. महाराष्ट्र हा दिलदार आहे, गुजरातमध्ये एक नवीन केंद्र बनवलं असतं तरी चाललं असत. मात्र येथून स्थलांतर करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. याला सबका साथ सबका विकास म्हणता येणार नाही अशी टीका सावंत यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details