महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Covid Positivity Rate : मुंबईत 56 दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 1 टक्क्यांवर

By

Published : Feb 10, 2022, 9:55 PM IST

मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली ( Covid Third Wave Mumbai ) आहे. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा ५६ दिवसानंतर पुन्हा १ टक्क्यावर आला ( Mumbai Covid Positivity Rate Decreased ) आहे. पालिका आयुक्त इकबालसिंग चहल ( IAS Iqbalsingh Chahal ) यांनी ही माहिती दिली.

कोरोना
कोरोना

मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली ( Covid Third Wave Mumbai ) आहे. ही लाट आता आटोक्यात आली आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील कोविड पॉझिटिव्हिटीचा दर 1 टक्केपर्यंत वाढला होता. तेव्हापासून, आज 56 दिवसांनंतर, पॉझिटिव्हिटीचा दर पुन्हा 1 टक्क्यांवर आला ( Mumbai Covid Positivity Rate Decreased ) आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल ( IAS Iqbalsingh Chahal ) यांनी दिली आहे.

सर्वात कमी एक अंकी मृत्यूदर

मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोना विषाणूची तिसरी लाट सुरू झाली. तिसर्‍या लाटेत, मुंबईत 2 लाख 85 हजार कोविड पॉझिटिव्ह केसेस होत्या. तिसर्‍या लाटेच्या 56 दिवसांमध्ये 312 म्हणजेच दररोज सरासरी 5.5 मृत्यू झाले. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही तुलनात्मक शहरासाठी तिसऱ्या लहरीतील हा सर्वात कमी एक अंकी मृत्यूदर आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप समाधानाची आणि अभिमानाची बाब असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

महामारीपासून लवकर सुटका करू

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू झाली. एका वर्षात मुंबईतील 114 टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर, 95 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना कोरोना विषाणूपासून वाचवले आहे. आपण सर्वांनी कोविडचे योग्य आचरण करूया आणि महामारीपासून लवकरात लवकर सुटका करू, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

इकबालसिंग चहल

आतापर्यंत 10 लाख लोकांना कोरोना

मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च २०२१ पासून सुरू झाला. पहिल्या लाटेदरम्यान रोज २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाच्या ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली, ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण १० लाख ५३ हजार ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २९ हजार ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. १६ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ६९८ सक्रिय रुग्ण ( Active Cases In Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९४९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा ( Corona Rate in Maharashtra ) दर ०.०७ टक्के इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details