महाराष्ट्र

maharashtra

Action Under MOCA : मद्यप्रेमींना दणका! गोव्याहून विनापरवाना दारू आणली तर, मोक्का अंतर्गत कारवाई

By

Published : Oct 3, 2022, 10:41 PM IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ( State Excise Department ) मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी एक फतवा काढला आहे. जर गोव्याहून विनापरवाना ( Action for bringing liquor without license ) एक देखील मद्याची बाटली आणल्यास त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई ( Action under MOCA against liquor without license ) करण्याचे आदेश दिले आहेत.

Action Under MOCA
मोका अंतर्गत कारवाई

मुंबई : मद्यप्रेमींसाठी आता मोठी बातमी समोर येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ( State Excise Department ) मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी एक फतवा काढला आहे. जर गोव्याहून विनापरवाना ( Action for bringing liquor without license ) एक देखील मद्याची बाटली आणल्यास त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई ( Action under MOCA against liquor without license ) करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.

राज्यात दारूची तस्करी -गोव्यात मजेसाठी जातात आणि परत येत असताना अनेक मद्यप्रेमी हे छुप्या मार्गाने दारूच्या बाटल्या या महाराष्ट्रात आणतात. गोव्यात दारूवरील टॅक्स कमी असल्याने देखील राज्यात याची तस्करी केली जाते. यामुळे ही तस्करी थांबवण्यासाठी आता शिंदे सरकारने कठोर पावले उचलली आहे. काही नागरिक हे गोव्यातून मद्याच्या दुकानातून परवाना घेऊन राज्यात दारू घेऊन येत होते.

मोक्का लावण्याचे आदेश -मात्र, शंभूराज देसाई यांनी गोव्याला अशा प्रकारचा परवाना देण्याचा काहीही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावण्याचे आदेश देण्यात असल्याचे देसाई यांनी सांगतिले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असा परवाना देण्याचा त्यांना अधिकार नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details