महाराष्ट्र

maharashtra

Gold Purchase : देशात सोने खरेदीत 40 टक्क्यांची वाढ; 4 महिन्यात 79 हजार 270 कोटींची खरेदी

By

Published : Aug 2, 2022, 3:45 PM IST

Updated : Aug 2, 2022, 5:24 PM IST

कोरोना काळ संपल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये सोने खरेदी आणि गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ झाली ( forty percent gold purchase increase in four months ). त्याबाबतची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार समोर आली आहे. मात्र पुढील काही महिन्यात सोने बाजारातील ही तेजी कायम राहणार ( boom in gold market continue )असल्याचे मत अर्थ तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

40 percent increase in gold purchases
सोने खरेदीत 40 टक्क्यांनी वाढ

मुंबई -कोरोना काळ सरल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये सोने खरेदी आणि गुंतवणुकीमध्ये जवळपास चाळीस टक्के वाढ झाली ( forty percent gold purchase increase in four months ). त्याबाबतची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार समोर आली आहे. मात्र पुढील काही महिन्यात सोने बाजारातील ही तेजी कायम राहणार ( boom in gold market will continue )असल्याचे मत अर्थ तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

चार महिन्यात 40 टक्क्यांनी वाढ -भारत देश हा सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक मोठा जागतिक ग्राहक म्हणून गणला जातो. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोने खरेदीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक सूवर्ण परिषदने ( World Gold Council ) दिलेल्या नव्या अहवालानुसार मार्च ते जून या चार महिन्याच्या कालावधीत जवळपास 40 टक्क्यांनी सोने खरेदीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात पसंती दिल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यात ही वाढ जवळपास 40 टक्क्यांनी वाढली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2021 मध्ये मार्च ते जून या दरम्यान जवळपास 51 हजार 540 कोटी रुपयांची सोने खरेदी देशामध्ये झाली होती. मात्र 2022 मध्ये मार्च ते जून या चार महिन्याच्या दरम्यान जवळपास 79 हजार 270 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या चार महिन्यात जवळपास 22 हजार कोटी रुपयांची अधिक उलाढाल सोने खरेदीमध्ये झाली असल्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने काढला असून, हा आकडा जवळपास 40 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

सोने खरेदीकडे ग्राहकांच्या आधी व्यापाऱ्यांचा कल - मात्र सध्या सोने खरेदीकडे ग्राहकांच्या आधी व्यापाऱ्यांचा मोठा कल असला तरी, येणाऱ्या काळात वाढती महागाई जागतिक स्तरावर रुपयाचे कमी होणारे मूल्य याचा परिणाम सोने खरेदीवर होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात सोने खरेदीची घट होण्याची शक्यता ( Gold purchases likely to decline ) ही जागतिक सूवर्ण परिषदेने वर्तवली आहे. जागतिक स्तरावर सोने खरेदीची मागणी कमी झाली असून जवळपास ही मागणी आठ टक्क्यांपर्यंत कमी झाली असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदवले गेले आहे.


सोने खरेदीकडे कल का वाढत आहे? -कोरोना काळानंतर भारतातले सध्याचे वातावरण पाहता गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिक यांचा कल सोने खरेदीकडे जास्त आहे. सोन्याचं रोज वाढत जाणारे मूल्य, तसेच परताव्याची सुरक्षित हमी यामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून वळला आहे. यासोबतच शेअर बाजारात सातत्याने होणारी घसरण पाहता गुंतवणूकदारही मोठ्या प्रमाणात सोने खरेदीकडे वळला आहे. त्याचा थेट फटका शेअर बाजाराला पडला असून, मोठा प्रमाणात फायदा हा सोने व्यापाराला झाला असल्याचे मत अर्थतज्ञ पंकज जयस्वाल यांनी व्यक्त केल आहे. सुरक्षित गुंतवणूक ही सोन्यात वाटत असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तर केली जात आहे. मात्र यासोबतच आपल्या देशातील प्रत्येक धर्मातील संस्कृतीचा कल हा सोने खरेदीकडे अधिक आहे. सण उत्सव साजरे करताना तसेच घरातील लग्नकार्यात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. कोरोनाचा काळ गेल्यानंतर सुरक्षित गुंतवणूक आपल्याकडे असावी यासाठी व्यापारी वर्ग सहित सामान्य नागरिकही सोने खरेदी कडे कल जास्त देत आहे. दोन वर्ष लग्न समारंभ सोहळे बंद होते. अगदी मोजक्या लोकांमध्ये सोहळे पार पाडले जात होते. मात्र आता ही सर्व बंद उठलेली आहे. त्यामुळे लोकांनाही सुरक्षित वातावरण मिळत असून लग्न सोहळा यांना लोकांकडून खर्च केला जातोय. त्याच अनुषंगाने सोने खरेदीकडे सामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात झुकला असल्याचं मत अर्थतज्ञ पंकज जयस्वाल यांनी व्यक्त केलं.

दिवाळीपर्यंत सोने खरेदीमध्ये तेजी राहण्याची शक्यता -साधारणतः गेल्या काही दिवसात 150 टन सोनं भारतामध्ये आयात करण्यात आल आहे. गेल्यावर्षी 130 टन सोनं आयात करण्यात आलं होतं. आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही सोनं आयात करण्यात आलं नव्हतं. सोने बाजारात असलेल्या तेजीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आयात करण्यात आला असून लग्नसराईत देशात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी आणि गुंतवणूक करण्यात आली. त्यामुळेच जवळपास 40 ते 45 टक्‍क्‍यांपर्यंत सोने खरेदीत वाढ झाली असल्याचे इंडियन बुलियर ज्वेलर असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केला आहे. नुकतीच देशांमध्ये लग्नसराई पार पडली. यावेळी मोठ्या प्रमाणात सोने खरेदीवर लोकांचा भर होता. तसेच पुन्हा एकदा कोरोना नंतर देशात सण सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. आता एका मागून येणारे मोठे सण असून यामध्ये देखील मोठे प्रमाणात सोने खरेदी केली जाणार असून सोने खरेदी मध्ये पंचेचाळीस टक्क्याची वाढ होणार असल्याचे मतही कुमार जैन यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -ED raids two places in Mumbai: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून दोन ठिकाणी छापेमारी

Last Updated : Aug 2, 2022, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details