महाराष्ट्र

maharashtra

ST Employee Suicide Issue : 'या' कारणामुळे आत्तापर्यंत ३३ एसटी कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या

By

Published : Nov 10, 2021, 7:08 PM IST

एसटीची आर्थिक स्थिती इतक्यात सुधारेल असे वाटत नाही. त्यामुळे महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज राज्यभरातील एसटी कर्मचारी  महामंडळाला शासनात विलीनीकरणाचा मागणी ठाम असल्याने संपावर गेले आहे.

३३ एसटी
३३ एसटी

मुंबई -गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) नियमित वेतन न मिळत असल्याने अनेक कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे अनेकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत महामंडळातील ३३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या (ST employees commit suicide) केली आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्यांचे(ST Employee Suicide Issue) सत्र सुरुच आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन आपल्या विविध मागण्या घेऊन २७ ऑक्टोबरपासून पासून संप पुकारला आहे.

मानसिक दबावातूनच आत्महत्या!

पूर असो की नैसर्गिक आपत्ती, कोरोनाची महामारी की, निवडणुकीची धामधूम, यामध्ये एसटी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे वेळेत होत नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंब उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. कित्येक कर्मचारी, चालक व वाहक उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विकणे, चहाची टपरी चालवणे, मजुरी करणे अशी वेगवेगळी कामे करत आहेत. काही एसटी कर्मचारी शेतमजूर म्हणूनही काम करताना राज्याच्या विविध भागात दिसून आले आहेत. सणासुदीतही कामगारांना वेळेत वेतन मिळत असल्याने कामगार हवालदिल झाले आहे. आज वाढत्या महागाईच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार खूप कमी पडत आहेत. त्यातच घराचे हप्ते, मुलांचा शिक्षणाचा खर्च, किराणा खर्च आदी विविध खर्च भागवणे कर्मचाऱ्याला खूप अवघड जात आहे. सततच्या मानसिक दबावातूनच ते आत्महत्यासारखे (ST Employee Suicide Issue) टोकाचे पाऊल उचलत असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च २०२० ते मे १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात ३३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

'महामंडळाचे विलीनीकरण शिवाय पर्यांय नाही'

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. वेतनातील हा फरक जवळपास ५ ते ७ हजार रुपयांचा आहे. कायद्याने वेतनवाढीस मान्यता दिलेल्या या तरतुदीची अद्याप अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार नाही. एसटी महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नावर या पुढे आर्थिक गणित जुळणे मुश्कील आहे. विशेष म्हणजे डिझेल दरवाढ झाल्याने अजून आर्थिक गणित कोलमडून जात आहे. एसटीची आर्थिक स्थिती इतक्यात सुधारेल असे वाटत नाही. त्यामुळे महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भावनाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आज राज्यभरातील एसटी कर्मचारी महामंडळाला शासनात विलीनीकरणाचा मागणी ठाम असल्याने संपावर गेले आहे.

आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव

१) कै. एस एस जानकर
वाहक, माहुर आगार /नांदेड विभाग

२) मनोज चौधरी
वाहक, जळगाव आगार

३) सुभाष तेलोरे
चालक, पाथर्डी आगार

४) ज्ञानेश्वर चव्हाण

५) पांडुरंग गडदे
वाहक, रत्नागिरी आगार

६) कमलेश बेडसे
साक्री आगार धुळे विभाग

७) कारभारी विठ्ठल गिते
चालक, कल्याण आगार

८) गणपत लाडसे
वाहक राजुरा

९) प्रमोद वाकोई
चालक तुमसर आगार

१०) अंजली भुसनाळे
वाहक, येवला आगार
(दोन मुला सहित आत्महत्या)

११) जी बी अंगनाळे
कंदार आगार, नांदेड विभाग

१२) अमोल माळी

१३) तुकाराम सानप
बीड आगार

१४) धोंडीराम माळी
मैकेनीक, इस्लामपुर आगार

१५) संजय रामराव केसगिरे
उदगीर आगार

१६) दशरथ गिड्डे
मेकॅनिकल, पंढरपूर आगार

१७) अशोक नाईकवाडी
नाशिक विभाग

१८) केंद्रे ताई
अहमदपूर

१९) प्रकाश भुरके
सोलापुर विभाग

२०) मनोज चौधरी
जळगाव आगार

२१) संजय जानकर
माहुर आगार

२२) अमोल माळी
इस्लामपूर आगार

२३) हर्षद राव
वरोरा

२४) शरद जाधव
निलंगा आगार

२५) कमलाकर बेडसे
साक्री आगार

२६) दिपक पारगे
रत्नागीरी

२७) प्रकाश पावरा
शहादा

२८) विशाल हटवार
नागपुर

२९) शत्रुघ्न कंगाने
साकोली आगार

३०) धनंजय नामे
देवरुख आगार

३१) भास्कर वंजारे
पांढरकवडा

३२) कृष्णा पुरी
कोल्हापूर विभाग

३३) सत्यजित ठाकुर
वाहतूक नियंत्रक
ब्रह्मपुरी आगार

हेही वाचा -ST Employees Protest : एसटी कर्मचारी निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचाऱ्यांचे 'मुंडण आंदोलन'

ABOUT THE AUTHOR

...view details