महाराष्ट्र

maharashtra

Breaking News : फडणवीसांच्या आशीर्वादाने अंडरवर्ल्डच्या गुंडांकडून वसुली आणि बनावट नोटांचा गोरखधंदा

By

Published : Nov 10, 2021, 6:31 AM IST

Updated : Nov 10, 2021, 1:12 PM IST

Breaking news
Breaking News : नवाव मलिक फोडणार हायड्रोजन बॉम्ब

13:11 November 10

गोपीनाथ पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  • मुंबई - गोपीनाथ पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत मंत्रालयावर आज मोर्चा काढणार होते
  • मात्र त्यापूर्वीच आमदार निवास येथून पोलिसांनी सोमय्या आणि पडळकर यांना ताब्यात घेतले 

13:09 November 10

ठाणे : खोपट डेपोमधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह केले बंद

ठाणे - एसटी प्रशासनाची संपाच्या विरोधात कारवाईला सुरुवात, ठाण्यातील खोपट डेपोमधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह केले बंद, एसटी कर्मचाऱ्यांचे रस्त्यावर आंदोलन.

13:04 November 10

मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाची हत्त्या करून फरार झालेल्या 4 आरोपींना रेल्वे पोलिसांनी केले जेरबंद

  • मनमाड (नाशिक) - मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाची हत्त्या करून फरार झालेल्या 4 आरोपींना रेल्वे पोलिसांनी केले जेरबंद
  • मुंबई येथून पकडण्यात आले चारही आरोपी
  • 6 नोव्हेंबर रोजी शिवम पवार या तरुणांची झाली होती हत्त्या
  • प्रेम प्रकरण आणि सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड करण्याच्या प्रकरणातून करण्यात आली होती हत्या

12:47 November 10

पुणे शहर भाजपने नवाब मालिकांच्या पुतळ्याचे दहन

पुणे - मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात मलिकांच्या पुतळ्याचे भाजपच्या वतीने दहन करण्यात आले. 

12:40 November 10

नवाब मलिकांविरोधात भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन

  • नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नागपुरात गणेशपेठ चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात आंदोलन केले.
  • यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी  केली.

12:32 November 10

नवाब मलिकांवर मानहानीचा दावा दाखल करणार - मुन्ना यादव

  • नागपूर  - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कुख्यात गुंडाची - मुन्ना यादव यांची शासकीय मंडळावर नियुक्ती केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिक यांनी केला आहे.
  • यावर मुन्ना यादव यांनी नवाब मलिक यांनी माझावर खोटा आरोप केल्याचे म्हटले आहे. माझ्यावर केवळ  राजकीय वादातून मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपाविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहे,
  • नवाब मलिक यांची एक रुपयांची लायकी असल्याने त्यांचावर दोन दिवसात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे मुन्ना यादव यांनी म्हटले आहे.

12:15 November 10

अराफत व मुन्ना यादव यांच्यावर एक साधा गुन्हा दाखल नाही आहे - आशिष शेलार -

  • मुंबई - गुन्हेगारांना राजाश्रय हा तुमचा धंदा आहे. कुठलाही गैरव्यवहार फडणवीसांच्या काळात झाला नाही. फडणवीस यांच्या वरील आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
  • रियाज भाटी यांचा पंतप्रधान किंवा पंतप्रधान कार्यालय त्याच्याशी काही संबंध नाही.
  • पत्रकार परिषदेमध्ये अशिष शेलार यांनी रियाज भाटी याचे  शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर आणि इतर नेत्यांबरोबर असलेले फोटो दाखवले.
  • फोटो काढले म्हणजे त्यांचे संबंध आहेत, असे होत नाही.
  • रियाज भाटी याला राष्ट्रवादी काँग्रेसने  लपवल नाही ना, अशी शंका वाटू लागली आहे.
  • वाझे प्रकरणात रियाज भाटीचे नाव समोर आले आहे.
  • नवाब मलिक यांच्या विषयी चिंता वाटू लागली आहे.
  • शाहरुख खान याला अडचणीत आणण्याचे काम नवाब मलिक करत आहेत. अल्पसंख्याकांना नेस्तनाबूत करण्याचे काम नवाब मलिक करताहेत  का?

11:53 November 10

फडणवीसांच्या आशीर्वादाने अंडरवर्ल्डचे गुंड वसुली आणि बनावट नोटांचा गोरखधंदा

  • फडणवीसांच्या आशीर्वादाने अंडरवर्ल्डचे गुंड वसुली आणि बनावट नोटांचा गोरखधंदा चालवत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डच्या गुंडांकडून वसुलीचा धंदा सुरु केला होता, असा आरोप मलिकांनी केला आहे. रियाज भाटी, मुन्ना यादव यांच्याशी फडणवीसांचे काय संबंध आहेत, हे त्यांनी उघड करावे, असे मलिक यांनी म्हटले आहे.
  • नवाब मलिक यांनी आज रियाज भाटी, मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हैदर ही प्रमुख चार व्यक्तींची नावे घेतली आहेत. यातील रियाज भाटीचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे. तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात व्हीआयपी पास घेऊन कसा काय गेला होता, असा आरोप फडणवीसांवर केला आहे.

11:05 November 10

एसटी कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका

  • मुंबई -  एसटी कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल
  • मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

09:26 November 10

एसटी कर्मचाऱ्यांचे मानखुर्द चेक पोस्टवर अन्नत्याग आंदोलन, सदाभाऊ खोत देखील सहभागी

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर सुरू आहे. अजून देखील या आंदोलनाचा तिढा सुटलेला नाही. आज (बुधवार) एसटी कर्मचारी मंत्रालयासमोर आंदोलन करणार होते. हे आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांतर्फे मानखुर्द चेक पोस्ट येथे एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्यात आले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ उतरलेले सदाभाऊ खोत यांना देखील अडवण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावरच रोखून धरल्यानंतर त्यांनी आहे तिथेच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
 

07:31 November 10

समीर वानखेडेंच्या मेहुणीची नवाब मलिकांविरोधात पोलिसांत तक्रार

  • मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी काल मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
  • आयपीसीच्या कलम 354, 354 डी, 503 आणि 506 नुसार ही तक्रार देण्यात आली आहे.

06:21 November 10

Breaking News : नवाव मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब : देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम केले

नवाव मलिक यांची पत्रकार परिषद

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर आरोप केले होते त्यावर पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक म्हणाले होते की, दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडू, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही धमाका केला नाही. मात्र, मी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा दिला होता. 

Last Updated : Nov 10, 2021, 1:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details