महाराष्ट्र

maharashtra

ST Workers Strike Issue : कोल्हापुरातील एसटी संप स्थगित, अनेक कर्मचारी कामावर हजर

By

Published : Nov 28, 2021, 3:04 PM IST

Updated : Nov 28, 2021, 3:18 PM IST

एसटी कामगारांचा संप ( ST Workers Strike ) अखेर स्थगित करण्यात आला आहे. काही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असले तरी संघटनेकडून मात्र अधिकृतपणे संप तात्पुरता स्थगित करत असल्याचे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक ( ST Service Resumed ) सुरू झाली असून अनेक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जिल्ह्यातील 10 डेपोपैकी 4 ते 5 डेपो सुरू झाले आहेत.

एसटीने प्रवास करण्यासाठी आलेले प्रवासी
एसटीने प्रवास करण्यासाठी आलेले प्रवासी

कोल्हापूर - गेल्या 15 ते 16 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संप ( ST Workers Strike ) अखेर स्थगित करण्यात आला आहे. काही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असले तरी संघटनेकडून मात्र अधिकृतपणे संप तात्पुरता स्थगित करत असल्याचे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी वाहतूक ( ST Service Resumed ) सुरू झाली असून अनेक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जिल्ह्यातील 10 डेपोपैकी 4 ते 5 डेपो सुरू झाले आहेत.

एसटी सेवा सुरु झाल्यानंतर प्रवाशांनी दिलेल्या प्रतिक्रिया
प्रवाशांकडून स्वागत

दरम्यान अनेक दिवसांपासून एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल सुरू होते. अनेक कामगार, विद्यार्थी किंवा कामानिमित्त या गावाहुन त्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू होते. सर्वांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांकडून सुद्धा स्वागत करण्यात आले आहे. शिवाय एसटी सेवा सुरू झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज (रविवारी) मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र सद्यस्थितीत 4 डेपो सुरू असून एकूण 100 पेक्षा कमी एसटी रस्त्यावर धावत आहेत. किती कर्मचारी कामावर पुन्हा हजर होतात त्यानुसार पुढील एसटी वाहतूक पूर्वीप्रमाणेच आहे. त्या वेळेत सुरू करणार असल्याचे कोल्हापूर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी म्हटले आहे.


कोणकोणत्या फेऱ्या सुरू यावर एक नजर

कोल्हापूर आगारातून 21 फेऱ्या सुरू
कोल्हापूर स्वारगेट 7 फेऱ्या सुरू
कोल्हापूर कोडोली 1 फेरी सुरू
कोल्हापूर सांगली 3 फेऱ्या सुरू
कोल्हापूर इस्लामपूर 1 फेरी सुरू
कोल्हापूर इचलकरंजी 1 फेरी सुरू
कोल्हापूर गारगोटी 1 फेरी सुरू
कोल्हापूर चंदगड 1 फेरी सुरू
कोल्हापूर पणजी 2 फेऱ्या सुरू
कोल्हापूर गडींगलज 1 फेरी सुरू
इचलकरंजी-कोल्हापूर एसटी सेवा सुरू

हेही वाचा -ST Worker Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने समन्वयाची भूमिका घ्यावी - प्रवीण दरेकर

Last Updated : Nov 28, 2021, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details