महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी; अनेक महत्वाचे मार्ग बंद

By

Published : Jul 23, 2021, 9:07 AM IST

Updated : Jul 23, 2021, 9:47 AM IST

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 111 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक महत्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी मार्ग, बालिंगा, बावडा-शिये मार्गावर सुद्धा पाणी आल्याने हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील काही महत्वाच्या भागात सुद्धा आता पाणी शिरले आहे.

पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर - गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या 24 तासांपासून तर जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरू असून पंचगंगेच्या पाण्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 46.01 फुटांवर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदी आणखीनच रौद्र रूप घेण्याची शक्यता आहे. धोका पातळी पेक्षाही 3 फूट वरून पंचगंगा नदी वाहू लागली असल्याने आता चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थलांतरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापुर जिल्ह्यात सध्या 2 एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या चिखली गावात त्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
111 बंधारे पाण्याखाली; शहरातील काही भागात सुद्धा पाणी -मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 111 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक महत्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी मार्ग, बालिंगा, बावडा-शिये मार्गावर सुद्धा पाणी आल्याने हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील काही महत्वाच्या भागात सुद्धा आता पाणी शिरले आहे. शहरातील महत्वाच्या चौकांपैकी एक चौक असलेल्या व्हीनस कॉर्नर परिसरात सुद्धा आता पाणी आले आहे. पाण्याची पातळीत सातत्याने वाढ होत असून पावसाचा जोर सुद्धा कमी झाला नाहीये त्यामुळे अधिकच चिंता लागून राहिली आहे.
कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी
महामार्गावर निपाणी-कागल दरम्यान पाणी -पावसाचा जोर इतका वाढला आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील निपाणी - कागल मार्गावर मांगुर फाट्यावर पाणी असल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वाहने आता अडकून पडली आहेत. तसेच एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
Last Updated : Jul 23, 2021, 9:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details