महाराष्ट्र

maharashtra

BJP state vice president Suresh Halvankar : वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा - भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची मागणी

By

Published : Apr 19, 2022, 9:44 PM IST

महा विकास आघाडी सरकार कृत्रिम वीजटंचाई ( Artificial power scarcity ) निर्माण करत आहे. वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केला आहे.

Suresh Halvankar
Suresh Halvankar

कोल्हापूर : समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा, हा महा विकास आघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून त्याच्या कर्जमुक्तीच्या कागदी घोषणा करण्याचे व त्याचे खोटे श्रेय घेण्याचे प्रकार याआधी उघडकीस येऊनही विजेच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारने पुन्हा तोच खेळ मांडला. वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर ( BJP state vice president Suresh Halvankar ) यांनी केला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची मागणी



राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशा अभावी बंद नाहीत -यावेळी ते म्हणाले, राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशा अभावी बंद नसल्याचे, वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत आहे. असे असताना ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीजटंचाईला कारणीभूत आहेत. खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील टक्केवारी कमाईकरिताच हा कृत्रिम वीजटंचाईचा घाट घातला जात आहे, असेही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले.



तफावतीची टक्केवारी जाहीर करावी - केंद्र सरकारने वीज खरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधीयांचा जळफळाट सुरू आहे. दलालीतील टक्केवारी घटल्यामुळे अधिकाधिक वीज खाजगी स्रोतांकडून खरेदी करण्याकरिता वीजटंचाई भासवून सामान्य जनता, उद्योगक्षेत्र आणि शेतकऱ्यास वेठीला धरले जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. कोळशा अभावी वीजटंचाई ( Power shortage due to lack of coal ) झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, अगोदर विजेअभावी शेतकऱ्याचे प्राण कंठाशी आणायचे, मग कर्जबाजारी होणे भाग पाडायचे आणि कर्जमाफीची कोरडी सहानुभूती दाखवत त्याच्या भावनांशी खेळत राजकारण करायचे, असा हा हीन डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे. ऐन उन्हाळ्यात विजेची समस्या निर्माण करून जनतेच्या भावनांशी खेळ सुरू केल्यास, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा उद्रेक होईल व त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी दिला.

हेही वाचा -Gunaratna Sadavarte Kolhapur : सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details