महाराष्ट्र

maharashtra

Hanuman Chalisa Row : औरंगाबादेत मनसे कार्यकर्ते सापडेनात, पोलिसांच्या नोटीसीनंतर झाले 'नॉट रिचेबल'

By

Published : May 4, 2022, 11:22 AM IST

राज ठाकरेंच्या ( MNS Chief Raj Thackeray ) आदेशानंतर मनसेतर्फे राज्यभर मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजविण्यात येत आहे. त्यावर पोलिसांकडून कारवाईही सुरु झाली असून, पोलिसांनी औरंगाबादेतील मनसे कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या ( Police Issued Notice To MNS Workers ) आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्ते 'नॉट रिचेबल' झाले ( MNS Workers Not Reachable Aurangabad ) आहेत.

Police Notice To MNS Workers Aurangabad
पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस

औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी मस्जिदवरील भोंगे काढण्यासाठी दिलेली मुदत संपली असून, सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी सकाळीच हनुमान चालीसा लावल्याच पाहायला मिळालं. मात्र औरंगाबादेत मनसे पदाधिकारी नॉट रिचेबल झाले ( MNS Workers Not Reachable Aurangabad ) आहेत. शहरात शांतता असून, बहुतांश मस्जिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

मनसे कार्यकर्ते नॉट रिचेबल :मंगळवारी पोलीस विभागाने मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस ( Police Issued Notice To MNS Workers ) बजावल्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनाम सिंह गुलाठी यांनी रोष व्यक्त केला. तर बुधवारी 4 मे रोजी हनुमान चालीसा लावण्यावरून शहरात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानंतर बुधवारी काही ठिकाणी हनुमान चालीसा लावली जाईल, अशी शक्यता असताना मनसे पदाधिकारी नॉट रिचेबल असल्याच समोर आलं आहे. त्यामुळे सकाळी शहरातील परिस्थिती शांत असल्याच पाहायला मिळालं. तर मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मनसेच्या आवाहणाला प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार सोशल मीडियावर मानले आहेत.

मस्जिदीवरील भोंग्यांचा आवाज झाला कमी :बुधवारी मस्जिदवरील भोंग्यांचा आवाज कमी झाला नाही तर भोंग्यांना भोंग्याने उत्तर देऊ असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी हनुमान चालिसा वाजवण्यात आली. मात्र दुसरीकडे राज्यातील काही मस्जिदीत भोंगे न लावता नमाज पठन करण्यात आले. तर काही ठिकाणी भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला. औरंगाबादेत देखील जामा मस्जिद सोबत बहुतांश मस्जिदमध्ये भोंग्यांचा आवाज कमी ठेवण्यात आल्याचं पहायला मिळालं.


शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त :दिवसभर कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. 1 पोलीस आयुक्त, 3 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 39 पोलीस निरीक्षक, 139 पोलीस उपनिरीक्षक, 1248 कर्मचारी नेमण्यात आले. शहरातील 42 मशीद जवळ 28 पोलीस उपनिरीक्षक - सहाय्यक निरीक्षक व 154 शस्त्र धारक पोलीस कर्मचारी नेमण्यात आले. अति संवेदनशील अशा 38 ठिकाणी आधिकारी व शस्त्रधारी पोलीस नेमलेले आहेत. शहरातील संवेदनशील परीसरात 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त गुन्हे शाखा, सायबर सेलव्दारे शहरातील समाजकंटक व गुंड यांच्यावर व शहरातील हालचालीवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. या व्यतिरिक्त शहरातील महत्वाच्या ठिकाणी SRPF व दंगा काबू पथक ही तैनात करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर पोलीस शहराची सार्वजनिक शांतता व कायदा व सु व्यवस्था अबाधित ठेवण्या साठी सज्ज असून, नागरिकांनीही पोलिसांना मदत करावी व अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ ट्विट, उद्धव ठाकरेंना करून दिली आठवण

ABOUT THE AUTHOR

...view details