महाराष्ट्र

maharashtra

जेटचे संस्थापक नरेश गोयल अडचणीत; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी

By

Published : Sep 6, 2019, 8:12 PM IST

गतवर्षी ई़डीने नरेश गोयल यांचे कार्यालय व निवासस्थानी झडती घेतली होती. त्यानंतर प्रथमच ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. गोयल यांनी मांडलेली बाजू फेमा कायद्यांतगर्त नोंदविण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

नरेश गोयल

मुंबई - जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज चौकशी केली. विदेशी चलन हस्तांतरण (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याचा गोयल यांच्यावर आरोप आहे. त्या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गतवर्षी ई़डीने नरेश गोयल यांचे कार्यालय व निवासस्थानी झडती घेतली होती. त्यानंतर प्रथमच ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. गोयल यांनी मांडलेली बाजू फेमा कायद्यांतगर्त नोंदविण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-सरकारी विमा कंपन्यांमध्ये केंद्र सरकार करणार १२ हजार कोटींची पुनर्गुंतवणूक

गोयल यांचे मुंबईमधील निवासस्थान, ग्रुपच्या कंपन्या, जेटच्या संचालकांची कार्यालये यांची ऑगस्टमध्ये झडती घेण्यात आली होती. ईडीमधील सूत्राच्या माहितीनुसार गोयल यांचे १९ विविध कंपन्यांवर नियंत्रण आहे. त्यापैकी ५ कंपन्या विदेशात आहेत. गोयल यांनी कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ई़डीचा दावा आहे. तसेच कंपन्यांचा झालेला खर्च हा बनावट असून खूप मोठा तोटा झाल्याचे भासविण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.


हेही वाचा-मोदी सरकारचे १०० दिवस ; 'अशी' आहे देशाची अर्थव्यवस्था


जेटएअरवेज बंद झाल्याने हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. यापूर्वी नरेश गोयल यांना रेड कॉर्नर नोटीस पाठवून विदेशात प्रवास करण्यावर सरकारने बंदी घातली आहे.

हेही वाचा-नोटांची सत्यता पडताळण्याकरिता दृष्टीहीनांसाठी आरबीआय आणणार अॅप, इंटरनेटचीही नाही भासणार गरज





जेटचे संस्थापक नरेश गोयल यांची ईडीकडून चौकशी

मुंबई - आर्थिक संकटात सापडल्याने जेट एअरवेज बंद पडली असताना कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.  त्यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज चौकशी केली. विदेशी चलन हस्तांतरण (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याचा गोयल यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणाबाबत चौकशी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.



गतवर्षी ई़डीने नरेश गोयल यांचे कार्यालय व निवासस्थानी झडती घेतली होती. त्यानंतर प्रथमच ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.   गोयल यांचे म्हणणे फेमा कायद्यांतगर्त रेकॉर्ड करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

गोयल यांचे मुंबईमधील निवासस्थान, ग्रुपच्या कंपन्या, जेटच्या संचालकांची कार्यालये यांची ऑगस्टमध्ये झडती घेण्यात आली होती. ईडीमधील सूत्राच्या माहितीनुसार गोयल यांचे १९ विविध कंपन्यांवर नियंत्रण आहे. त्यापैकी ५ कंपन्या विदेशात आहेत.

गोयल यांनी कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचा ई़डीचा दावा आहे. तसेच कंपन्यांचा झालेला खर्च हा बनावट असून  खूप मोठा तोटा झाल्याचे भासविण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

जेटएअरवेज बंद झाल्याने हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. यापूर्वी नरेश गोयल यांना रेड कॉर्नर नोटीस पाठवून विदेशात प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.




Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details