ETV Bharat / business

नोटांची सत्यता पडताळण्याकरिता दृष्टीहीनांसाठी आरबीआय आणणार अॅप, इंटरनेटचीही नाही भासणार गरज

author img

By

Published : Sep 6, 2019, 6:17 PM IST

नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंडने (एनएबी)  नव्या नोटा आणि नाणी ही दृष्टीहीनांना ओळखणे  कठीण जात असल्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीत बीटा अॅप हे १ नोव्हेंबरला उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयचे वकील वेंकटेश धोंड यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

प्रतिकात्मक

मुंबई - दृष्टीहीनांना नोटांची सत्यता पडताळण्यासाठी आरबीआय अॅप उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागणार नसल्याचे आरबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.

नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंडने (एनएबी) नव्या नोटा आणि नाणी ही दृष्टीहीनांना ओळखणे कठीण जात असल्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीत बीटा अॅप हे १ नोव्हेंबरला उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. त्या अॅपबाबत संबंधित पक्षाकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर अंतिम अॅप उपलब्ध केले जाणार आहे. काश्मीरमध्ये इंटरनेटवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अॅपचा कसा वापर होणार आहे, याबाबत न्यायालयाने आरबीआयच्या वकिलांना विचारणा केली.

हेही वाचा-'आरसीईपी' बैठकीच्या तयारीबाबत वाणिज्य मंत्रालय पंतप्रधानांना आज देणार सादरीकरण


नव्या २०, १०, २ आणि १ रुपयाच्या नाण्यांवर विशेष खूण असल्याचे सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. दृष्टीहीनांना ती नाणे ओळखता येतील, असे सरकारच्यावतीने वकिलांनी सांगितले. ही नवी नाणी नोव्हेंबरमध्ये बाजारात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ही नाणी तपासणीसाठी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. यावेळी काही दृष्टीहीन याचिकाकर्तेदेखील न्यायालयात उपस्थित होते.

हेही वाचा-कोळसा खाण कामगारांचा थेट विदेशी गुंतवणुकीला विरोध ; २४ सप्टेंबरपासून जाणार संपावर


जेव्हा याचिकाकर्त्याने खरी नाणी ओळखली, तेव्हा न्यायालयाने आपण योग्य दिशेने जात असल्याची टिपण्णी केली. मात्र, नाणी आकाराने लहान असल्याचे निरीक्षण मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांनी नोंदविले. नाणी दिवसेंदिवस लहान होत आहेत. नवे २० रुपयाचे नाणे हे १ रुपयाच्या नाण्याप्रमाणे आहे. तर नवे १ रुपयाचे नाणे हे जुन्या १ पैशासारखे असल्याचे त्यांनी म्हटले. नाणी व नोटांचा आकार आणि वैशिष्ट्ये हे बदलू नयेत, असेही न्यायालयाने म्हटले. सुरक्षा वैशिष्ट्ये टिकविण्याची कल्पना आहे. मात्र त्याचवेळी दृष्टिहीनांना अडचण होते. दृष्टीहीन व्यक्ती हा नोटा आणि नाणी ओळखण्यासाठी स्वत:ला प्रशिक्षित करतो, असे न्यायालयाने म्हटले.

हेही वाचा-सरकारी विमा कंपन्यांमध्ये केंद्र सरकार करणार १२ हजार कोटींची पुनर्गुंतवणूक


न्यायालय पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला घेणार आहे. या सुनावणीदरम्यान प्रस्तावित अॅपचा दृष्टिहीनांसाठी कसा वापरता येणार आहे, याचे प्रात्याक्षिक आरबीआयच्यावतीने दाखविण्यात येणार आहे.

Intro:Body:



 

===========================================

नोटांची सत्यता पडताळण्याकरिता दृष्टीहीनांसाठी आरबीआय आणणार अॅप

मुंबई - दृष्टीहीनांना नोटांची सत्यता पडताळण्यासाठी आरबीआय अॅप उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागणार नसल्याचे आरबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.



नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंडने (एनएबी)  नव्या नोटा आणि नाणी ही दृष्टीहीनांना ओळखणे  कठीण जात असल्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीत

 आरबीआयचे बीटा अॅप हे १ नोव्हेंबरला उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयचे वकील वेंकटेश धोंड यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. त्या अॅपबाबत संबंधित पक्षाकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर अंतिम अॅप उपलब्ध केले जाणार आहे. काश्मीरमध्ये इंटरनेटवर निर्बंध आण्यात आले आहेत.  त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अॅपचा कसा वापर होणार आहे, याबाबत न्यायालयाने आरबीआयच्या वकिलांना विचारणा केली.

 नव्या २०, १०, २ आणि १ रुपयाच्या नाण्यावर विशेष खूण असल्याचे कसरकारच्यावतीने न्यायालयात सांगिण्यात आले. त्यामुळे दृष्टीहीनांना ती नाणे ओळखता येतील, असे सांगितले.

हे नवी नाणी नोव्हेंबरमध्ये बाजारात येणार असल्याचेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले. ही नाणी तपासणीसाठी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. तर काही दृष्टीहीन याचिकाकर्तेदेखील यावेळी न्यायालयात उपस्थित होते.

जेव्हा याचिकाकर्त्याने खरी नाणी ओळखली तेव्हा न्यायालयाने आपण योग्य दिशेने जात असल्याची टिपण्णी केली. मात्र, नाणी आकाराने लहान असल्याचे निरीक्षण मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्राजोग यांनी नोंदविले. नाणी दिवसेंदिवस लहान होत आहेत. नवे २० रुपयाचे नाणे हे १ रुपयाच्या नाण्याप्रमाणे आहे. तर नवे १ रुपयाचे नाणे हे जुन्या १ पैशासारखे असल्याचे त्यांनी म्हटले. नाणी व नोटांचा आकार आणि वैशिष्ट्ये हे बदलू नयेत, असेही न्यायालयाने म्हटले.

सुरक्षा वैशिष्ट्ये टिकविण्याची कल्पना आहे. मात्र त्याचवेळी दृष्टिहीनांना अडचण होते. दृष्टीहीन व्यक्ती हा नोटा आणि नाणी ओळखण्यासाठी  स्वत:ला प्रशिक्षित करतो, असे न्यायालयाने म्हटले.

 न्यायालय पुढील सुनावणी  ४ नोव्हेंबरला घेणार आहे.

प्रस्तावित अॅपचा दृष्टिहीनांसाठी कसा वापरता येणार आहे,  याचे प्रात्याक्षिक आरबीआयच्यावतीने पुढील सुनावणीत दाखविण्यात येणार आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.