महाराष्ट्र

maharashtra

LSG Vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय

By

Published : Apr 20, 2022, 6:58 AM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या 31 व्या सामन्यात बंगळुरूने 181 धावांचा यशस्वी बचाव केला आणि लखनौला 163 धावांवर रोखले. (RCB vs LSG) बंगळुरूचा या मोसमातील हा पाचवा विजय असून ते आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौचा सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. आरसीबीचा हा पाचवा विजय आहे. त्याचबरोबर लखनौचा हा तिसरा पराभव आहे. फाफ डू प्लेसिसच्या 96 धावांच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 6 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ निर्धारित षटकांत केवळ 163 धावाच करू शकला. ( LSG Vs RCB IPL 2022 ) जोश हेजलवूडने चार षटकांत केवळ 25 धावा देत चार विकेट घेतल्या. हेझलवूडने क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, कृणाल पांड्या आणि आयुष बडोनी यांना त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल डाव सावरला - नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यातील पहिल्याच षटकात अनुज रावतच्या रुपात बंगळुरूच्या संघाला पहिला झटका बसला. त्यानंतर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. दरम्यान, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सावरला.

64 चेंडूत 96 धावा - पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्रुणाल पांड्यानं मॅक्सवेलला माघारी धाडलं. त्यानं 11 चेंडूत 23 धावा केल्या. परंतु, फाफ डू प्लेसिसनं संघाची एक बाजू संभाळली. त्याने अखरेच्या षटकापर्यंत फलंदाजी करत 64 चेंडूत 96 धावा केल्या. फाफ आपलं शतक पूर्ण करेल, असं वाटतं असताना दुष्मंता चमिरानं त्याला झेल बाद केलं. लखनौकडून दुष्मंता चमिरानं आणि जेसन होल्डर यांनी प्रत्यकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, क्रुणाल पांड्यानं एक विकेट्स मिळवली.

चांगली कामगिरी करता आली नाही - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिलेल्या 182 लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखौनच्या संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यात लखनौचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पाड्यानं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर, कर्णधार केएल राहुलनं 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली. त्यानंतर लखनौच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.

एक विकेट घेता आली - लखनौचा संघ चांगली कामगिरी करु शकला नाही त्यामुळे लखनौच्या संघाचा 18 धावांनी पराभव झाला. बंगळुरूकडून जॉश हेजलवूडनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, हर्षल पटेलनं दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेता आली.

हेही वाचा -Cyber Security Breach :सैन्यदलात सायबर सुरक्षेचा भंग; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details