ETV Bharat / bharat

Cyber Security Breach :सैन्यदलात सायबर सुरक्षेचा भंग; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

author img

By

Published : Apr 19, 2022, 7:04 PM IST

सूत्रांनी असेही सांगितले की व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे संवेदनशील माहिती देत नियमांचे उल्लंघन ( WhatsApp groups sensitive information ) करण्यात आले आहे. सैन्यदलाचे अधिकारीदेखील शेजारच्या देशाच्या हेरगिरी संबंधित कामामध्ये सहभागी ( Military officials suspected in spying ) असल्याचा संशय आहे. शा बाबी अधिकृत गुप्त कायद्याच्या ( official secret laws ) अधीन आहेत.

सायबर सुरक्षेचा भंग
सायबर सुरक्षेचा भंग

नवी दिल्ली - गुप्तचर यंत्रणांनी सैन्यदलात सायबर सुरक्षेचा भंग झाल्याची ( Cyber Security Breach in Indian Army ) माहिती दिली आहे. याबाबतचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले ( high level probe underway ) आहेत. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उल्लंघनात सहभागी काही सैन्य अधिकाऱ्यांचे शत्रू देशांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सूत्रांनी असेही सांगितले की व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे संवेदनशील माहिती देत नियमांचे उल्लंघन ( WhatsApp groups sensitive information ) करण्यात आले आहे. सैन्यदलाचे अधिकारीदेखील शेजारच्या देशाच्या हेरगिरी संबंधित कामामध्ये सहभागी ( Military officials suspected in spying ) असल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्तालाही सूत्रांनी दुजोरा दिला आहे. सैन्यदलाच्या माहितीनुसार की, सैन्यदलाच्या नियमानुसार शक्य तितकी कठोरपणे कारवाई केली जाते. कारण अशा बाबी अधिकृत गुप्त कायद्याच्या ( official secret laws ) अधीन आहेत.

चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या संशयित हेरगिरी प्रकरणावर अधिक तपशील देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. संरक्षण आस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासाच्या संवेदनशील स्वरूपामुळे, आम्ही चालू असलेल्या तपासावर किंवा या प्रकरणात गुंतलेल्यांबद्दल अंदाज टाळू इच्छितो. त्यामुळे सुरू असलेल्या तपासात अडथळा येऊ शकतो.

हेही वाचा-Swine Flu Infection In Pigs : त्रिपुरामध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढला, ६३ डुकरांचा मृत्यू

हेही वाचा-Hoax Bomb Call : विमानात बॉम्ब ठेवल्याची फोनवरून खोटी माहिती; श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला उशीर

हेही वाचा-Nine Dead as Pickup Overturned - जीप उलटून नऊ जणांचा मृत्यू, दहा जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.