महाराष्ट्र

maharashtra

Rahul Gandhi News: राहुल गांधींनी नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांची पाटण्यात घेतली भेट

By

Published : Apr 12, 2023, 2:11 PM IST

मोदी आडनावाचा अपमान केल्याबद्दल सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता याच प्रकरणात बिहारच्या पाटणा येथील न्यायालयात हजर राहावे लागत आहे. यापूर्वी दोनदा ते या खटल्याच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत. न्यायालयाने २५ एप्रिलला राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Rahul Gandhi News
राहुल गांधी

पाटणा : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज बिहारमधील पाटणा येथे पोहोचले आहेत. मोदींच्या आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेते आणि खासदार सुशील कुमार मोदी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला होता. पटनाच्या न्यायालयाने त्यांना कलम 317 अंतर्गत न्यायालयात हजर राहण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स पाठविले होते. मोदी आडनावाचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना न्यायालयाने २५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मोदी समाजाला चोर म्हणत अपमान :सुशील कुमार मोदी यांनी 2019 मध्ये राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाला चोर म्हणत अपमान केल्याचा त्यांनी खटल्यात आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना जामीन मिळाला होता. या प्रकरणात सुशील कुमार मोदी यांच्यासह पाच जणांची महत्त्वपूर्ण साक्ष पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचे याचिकाकर्ते खासदार सुशील मोदी यांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी देशातील लाखो मोदी आडनाव असलेल्या लोकांचा अपमान केला आहे. मागास समाजातील लोकांचे आडनाव मोदी आहे. त्यामुळे दुखावल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा : सुरत न्यायालयाने मोदी आडनावावर टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेनंतर राहुल यांचे संसदेचे सदस्यत्वही रद्द केले आहे. सदस्यत्व रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीसही दिली होती. त्यानंतर राहुल यांनी बंगला रिकामा करण्याची तयारी दाखविली आहे. अदानींवर बोलल्याबद्दल मला शिक्षा झाली आहे. तरी मी घाबरणार नाही. सरकारला प्रश्न करणे सोडणार नाही. केंद्र सरकारला विचारत राहीन की हे 20 हजार कोटी रुपयांबाबत विचारत राहिन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi Visit Wayanad : राहुल गांधी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडला देणार भेट

ABOUT THE AUTHOR

...view details