ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Visit Wayanad : राहुल गांधी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडला देणार भेट

author img

By

Published : Apr 11, 2023, 12:07 PM IST

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकली होती. हा त्यांचा दुसरा लोकसभा मतदारसंघ. गांधी कुटुंबाचा पारंपारिक बालेकिल्ला उत्तर प्रदेशातील अमेठीनंतर त्यांनी हा मतदारसंघ निवडला. अमेठीने राहुल यांना पाडले तर वायनाडने त्यांना मदत केली.

Rahul Gandhi Visit Wayanad
अपात्र खासदार राहुल गांधी आज त्यांच्या माजी लोकसभा मतदारसंघ वायनाडला देणार भेट

वायनाड (केरळ) : खासदारकीपासून अपात्रतेनंतर प्रथमच काँग्रेसचे राहुल गांधी मंगळवारी केरळमधील त्यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाला भेट देणार आहेत. राहुल यांच्या दौऱ्यासाठी येथील काँग्रेस नेत्यांनी चोख बंदोबस्त केला होता. दिवसभरात ते वायनाड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या कलपेट्टा शहरात एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील.

वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे बंद : यावर्षी 23 मार्च रोजी लोकसभा खासदार म्हणून अपात्र झाल्यापासून, राहुल गांधी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर सातत्याने हल्ला करत आहेत. काँग्रेस नेत्याने आता उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदींशी असलेल्या कथित संबंधांवर टीका केली आहे. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आणि त्यानंतर संसदेतून अपात्र ठरल्यानंतर देशात राजकीय तापमान वाढणे थांबलेले नाही. वायनाड हा केरळमधील 20 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. अपात्र ठरवलेले खासदार राहुल गांधी आज त्यांच्या लोकसभा मतदारसंघ राहिलेल्या वायनाडला भेट देणार आहेत.

गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला : 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, राहुल गांधी यांनी वायनाडमधून त्यांची दुसरी जागा म्हणून निवडणूक लढवली. त्यांनी त्यांच्या जवळचे प्रतिस्पर्धी आणि सीपीआय उमेदवार पी पी सनीर यांच्यावर 4,31,779 पेक्षा जास्त मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. त्या निवडणुकीत, राहुल गांधींचा मात्र भाजपच्या स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला-उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात 50,000 मतांच्या फरकाने पराभव केला. वायनाड हा उच्च साक्षरता स्तर आणि प्रबळ ख्रिश्चन समुदायासह एक नयनरम्य जिल्हा आहे. त्यापैकी बहुतेकांनी गेल्या काही दशकांमध्ये केरळ राज्यातील इतर भागातून आणि इतर ठिकाणांहून स्थलांतर केले आहे. येथील 30 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या डोंगराळ भागात राहते. आज राहुल गांधी वायनाडला जाऊन त्यांच्या मतदारांशी काय सवाद साधतात याची उत्सुकता आहे.

हेही वाचा : Deepali bhosale sayed : अभिनेत्री दीपाली भोसले यांनी माजी सहकाऱ्याविरूद्ध केली तक्रार; बदनामीची धमकी दिल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.