महाराष्ट्र

maharashtra

Punjab Election 2022 : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.44% टक्के मतदान, वाचा प्रत्येक क्षणाचे अपडेट

By

Published : Feb 20, 2022, 8:04 AM IST

Updated : Feb 21, 2022, 6:44 PM IST

पंजाबमध्ये आज 117 जागांसाठी मतदान, वाचा प्रत्येक क्षणाचे अपडेट
Punjab Election 2022 Live Updates

18:12 February 20

पंजाबमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.44% टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 5 वाजेपर्यंतचे मतदान

17:04 February 20

पंजाबमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 49.08% टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 3 वाजेपर्यंतचे मतदान

14:02 February 20

पंजाबमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 34.10% टक्के मतदान झाले आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंतचे मतदान

13:09 February 20

पंजाबमधील जनता सत्यासाठी मतदान करत आहे. या निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांनी व्यक्त केला.

13:08 February 20

पंजाब लोक काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला.

13:06 February 20

राज्यात एसएडी-बसपाची मजबूत लाट आहे, तुम्हाला लवकरच अपवादात्मक निकाल दिसेल, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल म्हणाले.

12:02 February 20

पंजाबमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 17.77 टक्के मतदान झाले आहे.

09:46 February 20

पंजाबमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 4.80 टक्के मतदान झाले आहे.

09:00 February 20

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भागवत मान यांनी मोहीलीमधील मतदान केंद्रात मतदान केले.

09:00 February 20

काँग्रेस उमेदवार मालविका सूट यांनी मतदानाचा हक्क बजावला.

07:56 February 20

Punjab Election 2022 Live Updates : संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.44% टक्के मतदान, वाचा प्रत्येक क्षणाचे अपडेट

नवी दिल्ली - पंजाबमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. पंजाबमधील सर्वच 117 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 16 व्या पंजाब विधानसभेसाठी 117 जागांसाठी 1 हजार 304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंजाबमध्ये 2.14 कोटी लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल-बसपा युती, भाजप-पीएलसी-शिरोमणी अकाली दल (युनायटेड) आणि विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेला संयुक्त समाज मोर्चा या पक्षांमध्ये लढत होणार आहे. तर काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पंजाब लोक काँग्रेस (PLC) आणि सुखदेव सिंह धिंडसा यांच्या नेतृत्त्वाखालच्या शिरोमणी अकाली दल (संयुक्त) सोबत भाजप पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक लढवत आहे.

यापूर्वी मतदानासाठी 14 फेब्रुवारीची तारीख जाहीर करण्यात आली होती. पण 16 फेब्रुवारीला साजरी होणारी रविदास जयंती लक्षात घेता मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची ( Election Commission of India ) तारीख 6 दिवसांनी बदलली होती. ( Election Commission of India on Punjab Assembly election ) त्यामुळे आज रविवारी पंजाब विधानसभेसाठी निवडणूक होत आहे.

बहूमताचा आकडा -

यापूर्वी पंजाब विधानसभा निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या विधानसभेचा कार्यकाळ 17 मार्च, 2022 ला संपणार आहे. पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 59 चा आकडा गाठावा लागतो.

प्रमुख मतदारसंघ -

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मतदारसंघ पटियाला (शहर), प्रकाश सिंग बादल यांचा मतदारसंघ लाम्बी, सुखबीर सिंग बादल यांचा मतदारसंघ जलालाबाद, नवज्योत सिंग सिद्धू यांचा मतदारसंघ अमृतसर (पूर्व) आणि सुखजिंदर सिंग रंधावा यांचा मतदारसंघ डेरा बाबा नानक हे प्रमुख मतदारसंघ आहेत.

मोठे चेहरे -

  • पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियाला शहर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंजाबमध्ये 2017 ला काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काँग्रेसमध्ये असलेले अमरिंदर सिंग यांनी 4 वर्ष पंजाबची सत्ता सांभाळली. पण, काँग्रेसमधील वादामुळे त्यांनी अखेरच्या वर्षात काँग्रेसला रामराम ठोकला आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी आपला स्वतःचा पंजाब लोक काँग्रेस नावचा (PLC) पक्ष स्थापन केला आहे.
  • काँग्रेसचे नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर (पूर्व) मधून रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसच्या हाती परत सत्ता आल्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
  • अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने नवीन मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. याशिवाय, काँग्रेसकडून परगट सिंग, आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सुखपाल खैरा आणि पंजाब कांग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओलविरोधात लढणारे सुनील जाखडही मैदानात आहेत.
  • शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पाचवेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंग बादल रिंगणात आहेत.
  • आम आदमी पार्टीचे पंजाबमधील एकमेव खासदार भगवंत मान धुरी येथून ते आपतर्फे निवडणूक लढवत आहेत. आपने मान हे आपले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचं जाहीर केले आहे. तसेच पंजाब पोलिस सेवेतील माजी महानिरीक्षक कुंवर विजय प्रताप सिंग, आम आदमी पार्टीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बलजिंदर कौर आणि प्रसिद्ध पंजाबी गायिका अनमोल गगन मान रिंगणात आहेत.

2017 पंजाब निवडणूक -

2017 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पंजाबच्या 117 पैकी 77 जागांवर विजय मिळाला होता. तर पंजाबमध्ये पहिल्यादांच रिंगणात उतरून 20 जागा मिळवत आम आदमी पक्षाने मोठी बाजी मारली होती. तर शिरोमणी अकाली दलाने 5 आणि भाजपाला 3 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय लोक इन्साफ पक्षाला दोन जागा काबिज करता आल्या. शिरोमणी अकाली दल आणि भाजपा यांची 30 वर्ष युती होती. मात्र, शेतकरी आंदोलनानंतर भाजपाबरोबर फारकत घेतली होती. त्यानंतर शिरोमणी अकाली दलनं बहुजन समाज पार्टीबरोबर आघाडी केली.

कुणाची कुणासोबत युती -

पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि संयुक्त समाज मोर्चा हे दोन पक्ष राज्यातील सर्व 117 विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवित आहेत. शिरोमणी अकाली दल (बादल गट) 97 तर त्यांच्या सोबत असलेला बहुजन समाज पक्ष 20 जागांवर निवडणूक लढवत आहे. भाजपा 68 जागांवर आणि त्यांच्या सोबत असलेला पंजाब लोक काँग्रेस 34 तर शिरोमणी अकाली दल (संयुक्त) 15 जागांवर निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा -State Assembly Election 2022 : पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान; जाणून घ्या सविस्तर

Last Updated : Feb 21, 2022, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details