महाराष्ट्र

maharashtra

Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपद निवडणूक.. ममता बॅनर्जींची बैठक.. उद्धव ठाकरे फिरवणार पाठ

By

Published : Jun 12, 2022, 12:51 PM IST

2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात दिल्लीत होणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला ( Presidential election 2022 meeting ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) उपस्थित राहणार नाहीत. शिवसेनेने ही माहिती दिली आहे.

Uddhav Thackeray Mamata Banerjee
उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक ( Presidential election 2022 meeting ) घेणार असून, या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) सहभागी होणार नाहीत. ही बैठक १५ जूनला होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधीपक्षांच्या बैठकीचे आयोजन केले असून, अनेक महत्त्वाचे नेते बैठकीत सहभागी होणार आहेत.

शिवसेनेने याबाबत माहिती दिली आहे. या बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार याबाबत सध्या पक्षाकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचा १५ जूनचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

तर त्याचवेळी शिवसेनेनेही या बैठकीत विरोधक ज्या उमेदवाराचे नाव राष्ट्रपती पदासाठी निवडतील, त्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धवजींना 15 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र एक कार्यक्रम आधीच ठरलेला आहे. त्यामुळे ते या बैठकीला जाणार नाहीत. त्यादिवशी आपण अयोध्येत असू, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांऐवजी आमच्या पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : राष्ट्रपतीपद निवडणूक : सोनिया गांधींनी साधला शरद पवार, ममता बॅनर्जींशी संपर्क

ABOUT THE AUTHOR

...view details