ETV Bharat / bharat

राष्ट्रपतीपद निवडणूक : सोनिया गांधींनी साधला शरद पवार, ममता बॅनर्जींशी संपर्क

author img

By

Published : Jun 12, 2022, 12:12 PM IST

"काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर काही विरोधी नेत्यांशी संपर्क ( Sonia reach out to Sharad Pawar ) साधला आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा केली," असे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले ( Congress in Presidential poll ) आहे.

sonia gandhi
सोनिया गांधी

नवी दिल्ली: आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी नेत्यांशी संपर्क ( Sonia reach out to Sharad Pawar ) साधला. त्यांनी शनिवारी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट ( Congress in Presidential poll ) घेतली.

सोनिया गांधी या कोरोनाने ग्रस्त असल्याने त्यांनी विरोधी पक्षनेते (LoP) मल्लिकार्जुन खर्गे यांना इतर नेत्यांशी समन्वय साधण्यासाठी नियुक्त केले ( Mallikarjun Kharge coordinating with leaders ) आहे. "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार, ममता बॅनर्जी आणि इतर काही विरोधी नेत्यांशी संपर्क साधला आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा केली," असे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे.

"इतर विरोधी नेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार, सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना इतर नेत्यांशी समन्वय साधण्यासाठी नियुक्त केले," असे निवेदनात म्हटले आहे. राज्यघटना, लोकशाही संस्था आणि नागरिकांचे सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या हल्ल्यापासून संरक्षण करू शकेल, अशा राष्ट्रपतीची देशाला गरज आहे, असे काँग्रेसचे मत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

"आपल्या देशाच्या आणि तेथील लोकांच्या हितासाठी आपल्याला मतभेदांच्या पुढे जाण्याची वेळ आली आहे. चर्चा आणि विचारविनिमय हे मनमोकळेपणाने आणि या भावनेनुसार केले पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह इतर पक्षांनी हे घेतले पाहिजे," असे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : Presidential Election : जम्मू - काश्मीर विधानसभा राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करणार नाही, हे आहे कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.