महाराष्ट्र

maharashtra

Omicron New Variant : भारतात ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट; इंदौरमध्ये नवीन 16 रुग्ण

By

Published : Jan 24, 2022, 2:43 PM IST

Updated : Jan 24, 2022, 3:13 PM IST

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संक्रमण वाढत आहे. अश्यातच इंदौर येथे ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंट BA2 ची ( Omicron New Variant ) नोंद झाली आहे. या नव्या स्ट्रेनचे येथे 16 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सहा लहान मुंलाचाही समावेश आहे यामुळे चिंता वाढली ( India omicron BA2 variant concern ) आहे.

omicron New Variant
ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट BA2

नई दिल्ली - भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संक्रमण वाढत आहे. अश्यातच इंदौर येथे ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंट BA2 ची ( Omicron New Variant ) नोंद झाली आहे. या नव्या स्ट्रेनचे येथे 16 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सहा लहान मुंलाचाही समावेश आहे. यामुळे आतारुग्ण वाढीची चिंता वाढली ( India omicron BA2 variant concern ) आहे.

ओमायक्रॉन BA.2 ने चिंता वाढवली -

भारतासह जगातील अनेक देशात ओमायक्रॉन बीए.2 हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. ब्रिटेन मध्ये या व्हेरिएंटचे 426 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंट ची ओळख ही जिनोम सिक्वेंसिंग ने होत आहे. हा व्हेरिएंट बीए.1 च्या प्रमाणे म्यूमेट करत नाही. मीडिया रिपोर्टर्रच्या माहितीनुसार भारत, फ्रांस, ब्रिटन आणि डेनमार्क यासह 40 देशात याचे रुग्ण आढळले आहेत. याची संक्रमण क्षमता अतिशय तीव्र असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

भारतात 24 तासांत 3,06,064 नवीन रूग्ण -

ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट BA2 हा मोठ्या प्रमाणात प्रसारित होणार व्हायसर आहे असे शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. भारतात मागील 24 तासात 3,06,064 नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत 27 हजार 469 कमी रुग्णांची नोंद झाली ( India Corona Updates ) असून दिवसभरात 439 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकुण सक्रीय रूग्णांची संख्या 3 कोटी 95 लाख 43 हजार 328 इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील लसीकरण -

देशात रूग्ण बरे होण्याचा दर 17.78 टक्क्यांवरून 20.75 इतका झाला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत देशभरात 162.26 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील जवळपास 72 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच 15 ते 18 वयोगटातील 52 टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा- Covid Peak : महामारी संपतेय पण 14 दिवसात कोरोना उच्चांक गाठु शकतो - आयआयटी विश्लेषकांचा दावा

Last Updated : Jan 24, 2022, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details