ETV Bharat / bharat

Covid Peak : महामारी संपतेय पण 14 दिवसात कोरोना उच्चांक गाठु शकतो - आयआयटी विश्लेषकांचा दावा

author img

By

Published : Jan 24, 2022, 9:56 AM IST

Covid Peak
कोरोना उच्चांक

आयआयटी मद्रासच्या (IIT Madras) गणित विभागातील डॉ. जयंत झा (Dr. Jayant Jha, Assistant Professor) यांनी सांगितले आहे की, मुंबई आणि कोलकाता (Mumbai and Kolkata) येथील आर-व्हॅल्यूज हे सूचित करतात की तेथे महामारीचा उच्चांक संपला आहे तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये (Delhi and Chennai) तो अजूनही एकच्या जवळपास आहे. साधारण 5 फेब्रुवारी पर्यंत म्हणजेयेत्या 14 दिवसात कोरोना उच्चांक गाठु शकतो .

नवी दिल्ली: भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार दर सांगणारा 'आर-व्हॅल्यू' 14 ते 21 जानेवारी दरम्यान आणखी कमी होऊन 1.57 झाला आहे आणि देशात संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या प्राथमिक विश्लेषणात ही माहिती देण्यात आली आहे. 'आर-व्हॅल्यू' एक व्यक्ती किती लोकांना संक्रमित करू शकते हे सांगते. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असे मानले जाते की जागतिक महामारी संपली आहे.

आयआयटी मद्रासने शेअर केलेल्या विश्लेषणानुसार, 'आर-व्हॅल्यू' हा 14 ते 21 जानेवारी दरम्यान 1.57, 7 ते 13 जानेवारी दरम्यान 2.2, आणि 1 ते 6 जानेवारी दरम्यान चार तर 25 ते 31 डिसेंबर दरम्यान 2.9 नोंदवला गेला होता. प्रोफेसर नीलेश एस उपाध्याय आणि प्रोफेसर एस सुंदर यांच्या अध्यक्षतेखाली गणित विभाग आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स अँड डेटा सायन्स यांनी संगणकीय मॉडेलिंगद्वारे प्राथमिक विश्लेषण केले.

आकडेवारीनुसार, मुंबईचा आर-व्हॅल्यू 0.67, दिल्लीचा आर-व्हॅल्यू 0.98, चेन्नईचा आर-व्हॅल्यू 1.2 आणि कोलकाताचा आर-व्हॅल्यू 0.56 आहे. डॉ. जयंत झा यांनी सांगितले की, मुंबई आणि कोलकाता येथील आर-व्हॅल्यूज असे सूचित करतात की तेथे महामारीचा उच्चांक संपला आहे, तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये तो अजूनही एकच्या जवळपास आहे. याचे कारण असे असू शकते की इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे बंधनकारक केले गेले आहे आणि त्यामुळे संसर्गाची कमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

झा यांनी सांगितले की, त्यांच्या विश्लेषणानुसार, कोरोना विषाणूचा उच्चांक येत्या 14 दिवसांत म्हणजे 6 फेब्रुवारीपर्यंत येईल. रविवारी भारतात संसर्गाची 3 लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण नोंदवल्यानंतर, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 3 कोटी 92 लाख 37 हजार 264 वर पोहोचली आहे. तिसरी लाट येण्याचे मुख्य कारण कोरोनाचे ओमायक्रॉन हे स्वरूप असल्याचे मानले जाते.

हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 40 हजार 805 रुग्णांची नोंद; तर 44 बाधितांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.