महाराष्ट्र

maharashtra

Minor Girl Rape in Hathras : हाथरस पुन्हा चर्चेत; 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 17 वर्षीय मुलाचा बलात्कार

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 11:26 AM IST

Updated : Nov 11, 2023, 12:39 PM IST

Minor Girl Rape in Hathras : हाथरसमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. शुक्रवारी पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला. सिकंदरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Minor Girl Rape in Hathras
Minor Girl Rape in Hathras

हाथरस Minor Girl Rape in Hathras :हाथरसजिल्ह्यातील सिकंदरा राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली होती. याच परिसरातील एका 17 वर्षीय मुलानं 7 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या घटनेमुळं उत्तर प्रदेशातील हाथरस पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

निर्जन स्थळी नेत बलात्कार : आपल्या गावाजवळ सोमवारी 7 वर्षीय अल्पवयीन मुलगी शेळ्या चरण्यासाठी गेली होती. तेवढ्यात एक मुलगा तिथं आला आणि त्यानं मुलीला निर्जन स्थळी नेलं. तिथं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीला धमकी दिल्यानं तिनं घरी गेल्यावर काहीही सांगितलं नाही. मात्र आईला संशय आल्यावर आईनं विचारलं असता, तिनं सगळा प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या वडिलांनी नराधमाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

तक्रारीत काय म्हटलंय : पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलंय की, सोमवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची 7 वर्षांची मुलगी त्यांच्या घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या टिकरी खुर्द गावात रस्त्याच्या कडेला शेळ्या चारत होती. त्यानंतर परिसरात राहणारा एक मुलगा तिथं आला. त्यानं आपली मुलगी एकटी असल्याचं पाहून तिचा विनयभंग केला. यास मुलीनं विरोध केल्यावर त्यानं तिला बळजबरीनं पकडून जवळच असलेल्या वनविभागाच्या इमारतीत नेलं आणि तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केला. तसंच जर मुलीनं आरडाओरड केल्यास तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीनं ती गप्प राहिली आणि घरात राहू लागली. मुलगी आजारी पडू लागल्याचं पालकांच्या लक्षात आलं. तिला नीट चालताही येत नव्हतं. अनेक वेळा विचारणा केल्यानंतर मुलीनं सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर वडिलांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सिकंदरा पोलीस ठाण्याचे प्रभारी आशिष कुमार सिंह यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Rape On Student : माणुसकीला काळीमा! आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकांचा बलात्कार
  2. Panipat Rape Murder Case : कारखान्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याला अटक; मृतदेह ठेवला होता कचऱ्यात लपवून
Last Updated : Nov 11, 2023, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details