महाराष्ट्र

maharashtra

Manipur Unrest : मणिपूरमध्ये सैन्यदलाला करावी लागली 12 अतिरेक्यांची मुक्तता, नेमके काय घडले?

By

Published : Jun 25, 2023, 10:30 AM IST

मणिपूरमध्ये लष्कर आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची परत एक घटना घडली आहे. 1200 पेक्षा अधिक महिलांनी सैन्याला घेराव घातला होता.या जमावाने सुरक्षा दलाने पकडलेल्या अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती.

लष्कराने केवायकेएलच्या 12 अतिरेक्यांना सोडलं
लष्कराने केवायकेएलच्या 12 अतिरेक्यांना सोडलं

इंफाळ :मणिपूरमधील परस्थिती दिवसेंदिवस वाईट होताना दिसत आहे. लष्कर आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची परत एक घटना घडली आहे. यावेळी महिलांचा जमाव आणि लष्कराच्या सैन्य आमने-सामने आले. महिलांच्या जमावामुळे सैन्याने पकडलेल्या कांगलेई यावोल कन्ना लूपच्या 12 अतिरिकेय्ांना सोडून द्यावे लागले आहे. परंतु 1200 पेक्षा अधिक महिलांनी सैन्याला घेराव घातला होता. या जमावाने सुरक्षा दलाने पकडलेल्या अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. जमावाच्या मागणीवर सुरक्षा दल आक्रमक न होता त्या अतिरेक्यांना सोडून दिले.

शोध मोहीम : संरक्षण दलाच्या पीआरओच्या अधिकृत प्रेस रिलीज नुसार, या भागाला लष्कराने वेढा घातला आहे. मात्र सध्या कोणतेही ऑपरेशन सुरू नाही. 24 जून रोजी सकाळी विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे इंफाळ पूर्व जिल्ह्यातील इथम गावात (अँड्रोपासून 06 किमी पूर्वेला) शोध मोहीम राबवण्यात आली होती. या शोध मोहिमेत सैन्याने युद्धात वापरलेली शस्त्रे, दारूगोळा आणि अनेक साधने जप्त केली. लष्कराने सांगितले की, स्थानिक लोकांची गैरसोय टाळण्यासाठी, विशिष्ट शोध सुरू होण्यापूर्वी परिसराची नाकेबंदी करण्यात आली.

महिलांचा घेराव :लष्कराच्या पत्रकानुसार, सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईनंतर 12 केवायकेएल कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मात्र, तेव्हाच महिला आणि स्थानिक नेत्याच्या नेतृत्वाखाली सुमारे 1200 ते 1500 च्या जमावाने तात्काळ टार्गेट परिसराला घेराव घातला. त्यावेळी सुरक्षा दलांनी कायद्यानुसार कारवाई सुरू ठेवण्यासाठी त्यांना वारंवार आवाहन केले. परंतु जमाव आक्रमक झाला होता. सुरक्षा दलाच्या विनंतीचा त्यांच्यावर कोणताच सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. मोठ्या संतप्त जमावावर लष्कराने कोणतीही आक्रमक कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक लोकांच्या मागणीनुसार लष्कराने 12 तरुणांची सुटका केली. मात्र, झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेली शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसामग्री त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.

हेही वाचा -

  1. Manipur Violence : 'मणिपूर मुख्यमंत्र्यांना हटवा, नाहीतर राष्ट्रपती राजवट लावा', विरोधी पक्षांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
  2. Sanjay Raut On PM Modi : मणिपूर जळते तरी पंतप्रधान दौऱ्यावर; अमित शाहांनी मणिपूरमध्ये लावावी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details