ETV Bharat / bharat

Manipur Violence : 'मणिपूर मुख्यमंत्र्यांना हटवा, नाहीतर राष्ट्रपती राजवट लावा', विरोधी पक्षांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी

author img

By

Published : Jun 24, 2023, 10:25 PM IST

मणिपूरमधील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

Manipur Violence all party meeting
मणिपूर हिंसाचार सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत अनेक विरोधी पक्षांनी राज्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. मात्र, सरकारने याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही. काँग्रेस आणि इतर काही पक्षांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली, तर काही विरोधी पक्षांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या बैठकीला भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

  • #WATCH | "The Union Home Minister assured that all steps will be taken to ensure no loss of life or property in Manipur," says BJP leader Sambit Patra on the all-party meeting convened by Union Home Minister on Manipur situation. pic.twitter.com/j2EiCihfRN

    — ANI (@ANI) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात शांततेसाठी प्रयत्न चालू - शाह : सरकारने बैठकीत सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचे सांगितले. बैठकीनंतर भाजपचे मणिपूर प्रभारी संबित पात्रा यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. पात्रा यांच्या म्हणण्यानुसार, गृहमंत्र्यांनी बैठकीत असेही सांगितले की, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून असा एकही दिवस गेला नसेल की जेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींशी परिस्थितीबद्दल चर्चा केली नसेल किंवा पंतप्रधानांनी सूचना दिल्या नसतील.

  • #WATCH | "When I started giving my suggestions, I think he did not want to listen. I also mentioned that this was not the time to politicise the issue as normalcy needs to be brought in the state. I asked him to give me at least 5 mins to speak on the issue but he asked me to… pic.twitter.com/OzOESHQ6ew

    — ANI (@ANI) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस : मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मे रोजी उसळलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या बैठकीला औपचारिकता सांगून काँग्रेसने म्हटले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने गांभीर्याने पुढाकार घ्यावा आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा तातडीने घ्यावा. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी मौन सोडले पाहिजे, असे म्हटले आहे.

  • #WATCH | Manoj Jha, RJD MP speaks after all-party meeting over the Manipur situation, he says, "It was an open discussion. The entire opposition went to the extent of saying that the person heading the administration of Manipur is not trustworthy...we can't have peace in Manipur… pic.twitter.com/FF2nv3NXkG

    — ANI (@ANI) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माजी मुख्यमंत्र्यांना पुरेसा वेळ दिला नाही : काँग्रेसच्या वतीने बैठकीला उपस्थित असलेले मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह म्हणाले की, बीरेन सिंह मुख्यमंत्री असताना शांतता प्रस्थापित करणे शक्य नाही. या बैठकीत आपल्याला काही मिनिटेच देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी बैठकीत आपले म्हणणे मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. सर्वपक्षीय बैठकीबाबत, तृणमूल काँग्रेसने एक निवेदन जारी करून सरकार 'मणिपूरला काश्मीरमध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहे का' असा सवाल केला आहे. त्यात हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची मागणी करण्यात आली.

'मणिपूरच्या जनतेचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही' : राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी सांगितले की, मणिपूरच्या जनतेचा तेथील मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. शिवसेनेच्या (उद्धव गट) प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, 'मी मणिपूरमधील अनेक गटांना भेटले आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री (राजकुमार रंजन सिंह) यांनी स्वत: सांगितले होते की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे.

हेही वाचा :

  1. Himanta Biswa Ram Madhav : मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतली?, हेमंता बिस्वा, राम माधव यांच्यावर गंभीर आरोप
  2. Manipur Violence : मणिपूरमधील समस्या धार्मिक नाही, दंगल गैरसमजातून झाली - केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.