महाराष्ट्र

maharashtra

Har Ghar Tiranga : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ

By

Published : Aug 7, 2022, 5:30 PM IST

Updated : Aug 7, 2022, 5:36 PM IST

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ( Maharashtra Sadan in Delhi) ‘ हर घर तिरंगा’ अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला (Launch of Har Ghar Tiranga Abhiyan). कस्तुरबा गांधी मार्ग (Kasturba Gandhi Marg) स्थित नवीन महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसींह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा

नवी दिल्ली: यावेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे , सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंदाच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा, यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी ध्वज उंचावून या अभियानाचा रितसर शुभारंभ केला.

हर घर तिरंगा

माहिती विभाग परिचय केंद्राच्या वतीने राबविल्यात येणा-या या अभियानाला यावेळी राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मांतरम्’, ‘भारत माता की जय’ या उद्घोषणा दिल्या. या उदघोषणांनी महाराष्ट्र सदन निनादले. दिल्लीत मराठी भाषीक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून राज्यात साजरे केले जाणारे सण , उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरे केले जातात.

हर घर तिरंगा

महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली स्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जाते. हर घर तिरंगा हा अभिनव उपक्रमा अंतर्गत दिल्ली स्थित विविध क्षेत्रात काम करणा-या मराठी भाषीक मान्यवरांच्या हस्ते ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचार प्रसार परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरुन केला जाणार आहे.

हेही वाचा : Har Ghar Tiranga : भारताचे 'ध्वज काका' दररोज 1 लाख ध्वज करतात तयार

Last Updated : Aug 7, 2022, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details